शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर टू अमेरिका...मराठी उद्योजकाचा यशोप्रवास; लोकसारंग हरदास यांची प्रेरणावाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 21:09 IST

नवीन पिढीसाठी आदर्श ठरणाऱ्या या उद्योजकाचे नाव लोकसारंग हरदास असून भल्याभल्यांना अचंबित करणारा त्यांचा प्रवास राहिला आहे.

ठळक मुद्देअब्जावधींचा ‘टर्नओव्हर’, पाय मात्र जमिनीवरच, भारतीय संस्कृतीच्या प्रचार-प्रसारावर भरदूरचे नियोजन टाळले लोकसारंग हरदास ‘एलआयटी’च्या कार्यक्रमासाठी नागपुरात आले असता ‘लोकमत’शी त्यांनी संवाद साधला. अनेक जण म्हणतात की मी फार अगोदरपासून नियोजन केले होते व त्यानुसार यश मिळविले. मात्र मी माझ्या आयुष्यात कधीही दूरचे नियोजन केले नाही. नागपूर सोडू

आॅनलाईन लोकमतनागपूर : एरवी अभियंता झाल्यानंतर विदेशातील कंपनीत ‘प्लेसमेन्ट’ मिळवून ‘डॉलरपती’ होण्याचे बहुसंख्य विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. ३४ वर्षांपूर्वी त्यांनीदेखील स्वत:ला सिद्ध करण्यासाठी नागपुरातून अमेरिकेत पाऊल ठेवले. मात्र दुसऱ्यांसाठी काम करण्यापेक्षा स्वत: दुसऱ्यांना रोजगार देणारे बनले पाहिजे, हा विचार मनात आला. मागे कुठलेही पाठबळ नसताना झपाटल्यागत काम केले अन् टप्प्याटप्प्याने यशोशिखर चढत गेले. आज त्यांच्याजवळ जगातील सर्व सुखसोई आहेत. कंपनीचा अब्जावधींचा ‘टर्नओव्हर’ आहे. मात्र असे असतानादेखील पाय जमिनीवर ठेवत कार्यरत राहण्यावर त्यांचा भर असून इतकी वर्षे देशाबाहेर राहिल्यानंतरदेखील त्यांनी संस्कृतीशी नाळ कायम ठेवली आहे. नवीन पिढीसाठी आदर्श ठरणाऱ्या या उद्योजकाचे नाव लोकसारंग हरदास असून भल्याभल्यांना अचंबित करणारा त्यांचा प्रवास राहिला आहे.नागपुरातील हडस हायस्कूलमधून शालेय शिक्षण घेतल्यानंतर हरदास यांनी लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीमधून रासायनिक अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली. त्यानंतर १९८३ साली उच्चशिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत गेले असताना एका ‘फार्मा’ कंपनीत नोकरीला सुरुवात केली. परंतु संबंधित रसायन आपणदेखील तयार करू शकतो हा विश्वास त्यांना होता. त्यामुळे त्यांनी एक नवी सुरुवात करण्याचा संकल्प केला आणि जोखीम घेतली. सुदैवाने त्यांना यात यश आले व तेथील वैद्यकीय तज्ज्ञांनीदेखील त्यांना सहकार्य केले. हळूहळू त्यांचे काम वाढत गेले व त्यांनी स्थापन केलेली ‘आॅसम प्रोडक्टर इन्कॉर्पोरेट’ ही कॅलिफोर्नियातील कंपनी ‘डिटर्जन्ट’ उत्पादनांच्या क्षेत्रातील आघाडीची कंपनी झाली आहे. आजच्या घडीला त्यांची कंपनी अमेरिकेतील ३० हजार ‘रिटेल आऊटलेट्स’शी जुळली असून पाचशेहून अधिक तरुणांना थेट रोजगार मिळाला आहे. आता तर कॅनडासोबत आणखी एका ठिकाणी ते ‘प्लान्ट’ विकत घेणार आहेत.उद्योगात येण्यासाठी भारतीयांनी पुढाकार घ्यावाअमेरिकेत भारतीय समुदाय अल्पसंख्यक असला तरी तो तेथील सर्वाधिक यशस्वी गट ठरला आहे. स्वत:च्या बळावर, मेहनतीतून भारतीय समूहाने हे स्थान मिळविले आहे. स्थानिक राजकारणात रस घेण्यापेक्षा ते नोकरीवर लक्ष केंद्रित करतात. उद्योग स्थापन करायचा म्हणजे विविध गोष्टींना हाताळायचे असते. त्यासाठी भारतीय तयार नसतात. मात्र भारतीयांनी अमेरिकेत मोठे यश संपादित केले आहे. त्यामुळे उद्योगातदेखील त्यांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे, असे हरदास म्हणाले.‘मिहान’मध्ये गुंतवणूक करणारआपले गृहशहर असलेल्या नागपूरबाबत हरदास यांना विशेष आपुलकी आहे. नागपुरातील अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी कंपनीत ‘प्लेसमेंट’ दिले आहे. नागपुरातील ‘मिहान’ प्रकल्पातदेखील ते गुंतवणूक करणार आहेत. यासंदर्भात अमेरिकेतील ‘एफडीए’च्या परवानगी मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतरच पुढील पावले उचलण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.अमेरिकेत स्थापन केले गणेशमंदिरसाधारणत: अमेरिकेत स्थायिक झाल्यानंतर पुढील पिढ्या भारतीय संस्कृतीपासून तुटत जातात. मात्र हरदास यांनी भारतीय संस्कृतीच्या प्रचार-प्रसारासाठी अनेक उपक्रम राबविले आहेत. त्यांनी कंपनीत गणेशमंदिरदेखील उभारले आहे. शिवाय अमेरिकेतील जनतेलादेखील भारतीय संस्कृतीचा परिचय व्हावा, यासाठी ते विविध उपक्रमांचे आयोजन करीत असतात, हे विशेष. त्यांची मुले ध्रुव व इंद्राणी हेदेखील अमेरिकेत वाढूनदेखील भारतीयत्वाशी जुळले आहेत.

 

टॅग्स :educationशैक्षणिक