शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

‘जय’ च्या ‘रेडिओ कॉलर’ चे गूढ वाढले!

By admin | Updated: September 10, 2016 02:11 IST

मागील चार महिन्यापूर्वी उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातून अचानक गायब झालेल्या ‘जय’ चा अद्याप सुगावा लागला नसला,

चार महिने उलटले : शोधमोहिम थंडावली नागपूर : मागील चार महिन्यापूर्वी उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातून अचानक गायब झालेल्या ‘जय’ चा अद्याप सुगावा लागला नसला, तरी त्याच्या गळ्यातील बंद पडलेल्या ‘रेडिओ कॉलर’ चे गूढ मात्र निश्चितच वाढले आहे. त्याचवेळी ‘जय’ च्या प्रकरणाची सीआयडी व सीबीआयच्या माध्यमातून चौकशी सुरू होणार असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र यासंबंधी वन मुख्यालयाला अजूनपर्यंत कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नसल्याचे सांगितले जात आहे. ‘जय’ च्या गळ्यातील ‘रेडिओ कॉलर’ ने गत १९ एप्रिलपासून सिग्नल देणे बंद केले असल्याचे स्वत: वन विभागाने मान्य केले आहे. मात्र त्याचवेळी ‘जय’ हा ब्रह्मपुरी आणि नागभीडच्याही पुढे सुमारे ५८० चौ. किलो मीटरच्या परिसरात भटकंती करीत होता, असाही वन विभागाने दावा केला आहे. यातच १९ एप्रिल रोजी ‘जय’ ची रेडिओ कॉलर बंद पडली आणि त्याचा वन विभागाशी संपर्क तुटला. अधिकाऱ्यांन्ांी केले दुर्लक्षनागपूर : मात्र असे असताना पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने तब्बल अडीच महिन्यांपर्यंत ती माहिती दडपून ठेवली. वास्तविक ‘जय’ ची रेडिओ कॉलर बंद पडली, त्याच दिवसापासून तो गायब झाला आहे. याची पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जाणीव असताना त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर जुलै महिन्यात संपूर्ण प्रकरणाचा भंडाफोड झाला आणि वन विभागाची झोप उडाली. वर्तमानपत्रात बातम्या झळकताच राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए) आणि राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) कार्यालायने पेेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयास ताबडतोब ‘जय’ चा शोध घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने पाच शोध पथके तयार करून वेगवेगळ्या दिशेने रवाना केले. या सर्व पथकांनी उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याच्या सभोवताल असलेल्या भंडारा, ब्रह्मपुरी, नागभीड व वडसा परिसरातील जंगल पिंजून काढले. मात्र तरी ‘जय’ चा कुठेही शोध लागला नाही. यामुळे वन विभागाने गडचिरोलीपर्यंत धाव घेऊन शोधाशोध केली, परंतु तरी ‘जय’ सापडला नाही. त्यामुळे वन विभागाची शोधमोहिम ही केवळ औपचारिकता सुरू असल्याचा वन्यजीव क्षेत्रातून सूर व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, सध्या व्याघ्र राजधानीचा सर्वत्र गवगवा होत आहे. अशा स्थितीत राज्याचा वन विभाग एका वाघाचा शोध घेण्यात अपयशी ठरत आहे. मात्र असे असताना वन मंत्रालय गप्प का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी)