शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीची छेडखानी करणाऱ्याचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बहिणीची छेडखानी करणाऱ्या आरोपीचा एका युवकाने साथीदारांच्या मदतीने खून केला. ही घटना बुधवारी रात्री ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : बहिणीची छेडखानी करणाऱ्या आरोपीचा एका युवकाने साथीदारांच्या मदतीने खून केला. ही घटना बुधवारी रात्री कपिलनगर पोलीस ठाण्यांतर्गत म्हाडा क्वाॅर्टरमध्ये घडली. कमलेश बंडू सहारे (२५) रा. गड्डीगोदाम असे मृताचे नाव आहे तर उज्ज्वल व त्याचे साथीदार, अशी आरोपींची नावे असल्याचे सांगितले जाते.

उज्ज्वलच्या बहिणीसोबत कमलेशची ओळख होती. कुटुंबीयांना याची माहिती होताच प्रकरण वाढले. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून कमलेशविरुद्ध कपिलनगर पोलिसांनी छेडखानीचा गुन्हा दाखल केला होता. अटक झाल्यानंतर कमलेशची तुरुंगात रवानगी झाली होती. अलीकडेच तो जामिनावर सुटून आला होता. उज्ज्वलच्या कुटुंबीयांनी कमलेशला परिसरात न येण्याची समज दिली होती. मंगळवारी एसीपीकडे पेशीदरम्यानसुद्धा कमलेशला उज्ज्वलच्या घराकडे जाण्यास मनाई करण्यात आली होती.

कमलेशची बहीण कपिलनगरातील म्हाडा क्वाॅर्टरमध्ये राहते. कमलेश बुधवारी रात्री ७ वाजता बहिणीच्या घरी आला होता. उज्ज्वलही परिसरात राहतो. कमलेश आल्याची माहिती होताच तो आपल्या साथीदारांसह कमलेशच्या बहिणीच्या घरी पोहोचला. त्याने घरासमोरच कमलेशवर हल्ला केला. त्याचा खून करून तो फरार झाला. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. झोन पाचचे डीसीपी नीलोत्पल घटनास्थळी पोहोचले. त्यांनी उज्ज्वलच्या संशयित साथीदारांना ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत कपिलनगर पोलीस प्रकरणाच्या तपासात गुंतले होते.