शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

धाकट्या भावाने केला थाेरल्याचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:13 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क काटाेल : थाेरला भाऊ दारू पिऊन घरी आला आणि त्याने शिवीगाळ करीत जेवणाचे ताट फेकले. ताट ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

काटाेल : थाेरला भाऊ दारू पिऊन घरी आला आणि त्याने शिवीगाळ करीत जेवणाचे ताट फेकले. ताट का फेकले, अशी धाकट्याने विचारणा करताच दाेघांमध्ये भांडणाला सुरुवात झाली. यात धाकट्याने जबर मारहाण केल्याने थाेरल्याचा मृत्यू झाला. ही घटना काटाेल पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील इसापूर (खुर्द) येथे मंगळवारी (दि. १६) रात्री ८.३० ते ११ वाजताच्या दरम्यान घडली असून, पाेलिसांनी आराेपीस अटक केली आहे.

राेशन नागाेराव ठाकरे (२५) असे मृताचे, तर नितेश नागाेराव ठाकरे (२३), रा. इसापूर (खुर्द), ता. काटाेल, असे अटकेतील आराेपीचे नाव आहे. राेशनला दारूचे व्यसन हाेते. ताे मंगळवारी रात्री दारूच्या नशेत घरी आला आणि शिवीगाळ करू लागला. नितेश घरी जेवण करीत असताना त्याने नितेशचे जेवणाचे ताट फेकले. त्यामुळे नितेशने त्याला ताट का फेकले, अशी विचारणा केली. त्यामुळे दाेन्ही भावांमध्ये भांडणाला सुरुवात झाली.

या भांडणाचे रूपांतर धक्काबुक्की व हाणामारीत झाले. राेशनने नितेशला धक्काबुक्की करीत घराबाहेर नेले. त्यातच राेशनचा ताेल गेला व ताे गायी बांधण्याच्या खुंटाजवळ पडला. ताे उठून पुन्हा मारहाण करण्याच्या तयारीत असतानाच नितेशने त्याला जाेरात धक्का दिल्याने ताे खुंटाजवळील दगडावर पडला. त्यातच नितेशने इंधनातील काठी घेऊन राेशनच्या डाेके, छाती व चेहऱ्यावर वार केले. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्याला काटाेल येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. तिथे डाॅक्टरांनी त्याला मृत घाेषित केले. याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी भादंवि ३०२, ५०६ अन्वये गुन्हा नाेंदवून आराेपी नितेशला अटक केली. या घटनेचा तपास पाेलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.

...

आईलाही मारण्याची धमकी

हे संपूर्ण मृत राेशन व आराेपी नितेशची आई नर्मदा नागाेराव ठाकरे (५०) यांना माहिती हाेते. डाॅक्टरांनी राेशनला मृत घाेषित केल्याने आपल्यावर खुनाचा गुन्हा दाखल हाेणार असल्याची जाणीव नितेशला हाेती. त्यामुळे प्रकरण दडपण्यासाठी त्याने आईला हा प्रकार कुणालाही न सांगण्याची सूचना केली हाेती. याबाबत ‘तू कुणालाही सांगितले तर मी तुलाही मारल्याशिवाय राहणार नाही’ अशी धमकीही त्याने आईला दिली हाेती. शेवटी, तिच्याच तक्रारीवरून काटाेल पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला आणि आराेपी नितेशला अटक केली.