शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

चेक बाऊन्समुळे मनपाची आर्थिक कोंडी

By admin | Updated: May 29, 2017 02:53 IST

शासकीय स्तरावर आर्थिक व्यवहार रोखीने न करता चेक किंवा आॅनलाईन करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.

मालमत्ता कर विभागाचे प्रकरण : ३ कोटी रुपयांचे ७६५ चेक बाऊन्सराजीव सिंह। लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय स्तरावर आर्थिक व्यवहार रोखीने न करता चेक किंवा आॅनलाईन करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. मात्र, हे धोरण नागपूर महापालिकेसाठी डोकेदुखी ठरत आहे. या व्यवस्थेमुळे मालमत्ता कर विभागाची तब्बल तीन कोटी पाच लाख रुपयांची कोंडी केली आहे. एवढ्या रकमेचे तब्बल ७६५ चेक वेगवेगळ्या कारणांनी बाऊन्स झाले आहेत. आता चेक बाऊन्सची प्रकरणे निकाली काढण्यासाठी मालमत्ता कर विभागाने आपल्या कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपविली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ७१ लाख ९३ हजार रुपयांच्या १५६ चेकचे प्रकरण निकाली निघाले आहे. झोन स्तरावर आता मालमत्ता विभागाकडे संबंधित चेक वटविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सद्यस्थितीत मालमत्ता कर हेच महापालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य साधन आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष संपल्यानंतरही मालमत्ता विभागाचे काम जोरात सुरू आहे. एप्रिल व मे या दोन महिन्यात तब्बल १२ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत वसुली एक कोटींनी जास्त आहे. अपर आयुक्त रवींद्र कुंभारे यांनी काही दिवसांपूर्वी कर विभागाचे अधिकारी व सहायक आयुक्तांची बैठक घेऊन कर संकलन व्यवस्थेचा आढावा घेतला होता. चेक बाऊन्स प्रकरणांचा त्वरित निपटारा करण्याचे व गरज भासल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले होते.