शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मुबारक बेगम जगताहेत उपेक्षेचे जीवन

By admin | Updated: May 24, 2016 02:43 IST

एकेकाळी आपल्या गोड गळ्याने रसिकांना भुरळ घालणारी हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायिका मुबारक बेगम आज अंथरुणावर पडल्या आहेत.

बॉलिवूड कलावंतांची पाठ : यशवंत बाजीराव यांचा मदतीचा हातनागपूर : एकेकाळी आपल्या गोड गळ्याने रसिकांना भुरळ घालणारी हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायिका मुबारक बेगम आज अंथरुणावर पडल्या आहेत. भारतीय संगीताला गोड गळ्याची श्रीमंती देणाऱ्या मुबारक बेगम आज मात्र आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने उपेक्षेचे जीवन जगत आहेत. त्यांच्याकडे उपचार करायलाही पैसे नाहीत. अशा वेळी नागपुरातील त्यांच्या एका चाहत्याने मदतीचा हात पुढे केला आहे.माजी आमदार डॉ. यशवंत बाजीराव यांनी नुकतेच मुबारक बेगम यांच्या मुंबईच्या जोगेश्वरी, बेरमबाग येथील घरी जाऊन त्यांना आर्थिक मदत केली. डॉ. बाजीराव स्वत: संगीतकार आहेत व ते मुबारक बेगम यांचे चाहतेही आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रकृतीबद्दल आणि आर्थिक परिस्थितीबाबत त्यांनी वर्तमानपत्रात वाचले होते. त्यांनी लगेच मुंबई गाठली आणि पत्ता काढत मुबारक बेगम यांचे घर गाठून त्यांची भेट घेतली. बाजीराव यांनी बेगम यांना नुसतीच मदत केली नाही तर त्यांच्या आमदार पेन्शनमधून दर महिन्याला पाच हजार रुपये देण्याचे वचनही दिले आहे. डॉ. बाजीराव यांनी दिलेल्या माहितीनुसार मुबारक बेगम यांचा मुलगा प्रकृतीने लाचार आहे. त्यांची नात एका दुकानात कामाला जाऊन घराचा गाडा चालविते. सुन व नात त्यांची सेवा करतात, हे विशेष. काही दिवसांपूर्वी त्या आजारी पडल्या. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र उपचाराचे पैसे द्यायलाही कुटुंबीयाजवळ पैसे नव्हते. कुटुंबीयांनी बॉलिवूडच्या अनेक कलावंतांना मदत मागितली. यावेळी लता मंगेशकर यांनी त्यांना मदत केल्याचे बाजीराव यांनी सांगितले. मात्र इतर कोणत्याही कलावंताने त्यांना मदतीसाठी हात पुढे केला नाही. ‘कभी तनहाईयो मे यूं हमारी याद आयेगी...’, ‘तुझको अपने गले लगा लूं ऐ मेरे हमराही...’ अशा काही अजरामर गीतांनी मुबारक बेगम यांनी हिंदी चित्रपट संगीताला श्रीमंत केले आहे. आपल्या गोड आवाजाने त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले होते. मुबारक बेगम आज ८० वर्षांच्या आहेत आणि आयुष्याच्या यावेळी त्यांना ही वेळ पाहावी लागत आहे. त्यांची गाणी आजही कर्णमधूर आहेत, मात्र अजरामर गाणी गाणाऱ्या मुबारक बेगम यांच्याकडे बॉलिवूड कलाकारांनीच पाठ फिरविली, असे दु:खाने म्हणावे लागते. (प्रतिनिधी)