शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

महावितरणने केला २३०७५ मेगावॅटचा विक्रमी वीज पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2022 21:08 IST

Nagpur News मागणीनुसार वीज पुरवठा करण्याचे आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढत उच्चांकी झेप घेत ८ फेब्रुवारी रोजी महावितरणने विक्रमी २३ हजार ७५ मेगावॅट विजेचा पुरवठा केला आहे.

ठळक मुद्देआजवरचे सर्व विक्रम मोडीत

नागपूर : मागणीनुसार वीज पुरवठा करण्याचे आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढत उच्चांकी झेप घेत ८ फेब्रुवारी रोजी महावितरणने विक्रमी २३ हजार ७५ मेगावॅट विजेचा पुरवठा केला आहे. मुंबई वगळता राज्याच्या उर्वरित भागात व महावितरणच्या कार्यक्षेत्रात आजवरच्या या सर्वाधिक मागणीप्रमाणे चोख नियोजनातून वीज पुरवठा करून महावितरणने वीज पुरवठ्याचा आजवरचा नवा विक्रमी टप्पा गाठला आहे. याआधी ९ मार्च २०२१ रोजी २२ हजार ३३९ मेगावॅट विक्रमी विजेचा पुरवठा करण्यात आला होता.

राज्यात उन्हाच्या झळा हळूहळू वाढायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे विजेचा वापर वाढला आहे. सोबतच कृषिपंपांद्वारे विजेचा वापरदेखील वाढला आहे. परिणामी, गेल्या काही दिवसांपासून विजेच्या मागणीत सातत्याने वाढ सुरू आहे. यामध्ये मंगळवारी राज्यात मुंबईसह तब्बल २५ हजार ९५५ मेगावॅट विजेची मागणी नोंदविण्यात आली. मुंबई वगळता राज्याच्या उर्वरित कार्यक्षेत्रात महावितरणकडून सुमारे २ कोटी ८१ लाख ग्राहकांना आजवरच्या उच्चांकी २३ हजार ७५ मेगावॅट विजेचा सुरळीत व अखंडित पुरवठा करण्यात आला. विजेची ही विक्रमी मागणी पूर्ण करताना राज्याच्या कोणत्याही भागात विजेचे भारनियमन करण्यात आले नाही, हे उल्लेखनीय.

महानिर्मिती ६ हजार ८७४ मेगावॅट, एनटीपीसी व एनपीसीआयएलकडून एकूण ४ हजार १५४ मेगावॅट तसेच अदानी पॉवर, रतन इंडिया, सीजीपीएल, जेएसडब्लू, साई वर्धा, एम्पो या खासगी प्रकल्पांमधून ४ हजार ८५३ मेगावॅट वीज उपलब्ध झाली आहे. सोबतच नवीन व नवीकरणीय ऊर्जेच्या स्रोतांमधून सौर ऊर्जा- २३३५ मेगावॅट, पवन ऊर्जा- १६६ मेगावॅट तसेच सहवीजनिर्मिती प्रकल्पांतून १२०० मेगावॅट असे एकूण ३ हजार ९९१ मेगावॅट वीज उपलब्ध झाली. उर्वरित विजेची मागणी ही कोयना, घाटघर व इतर जलविद्युत प्रकल्पांतून १ हजार ३२० मेगावॅट वीजनिर्मिती करून तसेच मुक्त ग्राहक व रेल्वेच्या वीजनिर्मिती स्रोत्रातून १ हजार ३५३ मेगावॅट आणि पॉवर एक्स्चेंजमधून ६३० मेगावॅट विजेची खरेदी करून पूर्ण केली आहे.

- ऊर्जामंत्र्यांनी केले कौतुक

महावितरणच्या या विक्रमी कामगिरीबद्दल राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी कौतुक करून अभिनंदन केले आहे.

टॅग्स :electricityवीज