शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

एमआरआय, सिटी स्कॅन कागदावरच

By admin | Updated: June 13, 2017 01:49 IST

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) ‘एमआरआय’ यंत्रच नाही.

मेयोतील रुग्ण अडचणीत : दोन महिन्यांपासून कालबाह्य सिटी स्कॅनही बंदलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) ‘एमआरआय’ यंत्रच नाही. कालबाह्य झालेले सिटी स्कॅनही गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे. परिणामी, गरीब रुग्णाला पदरमोड करुन बाहेरून निदान करावे लागत आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही यंत्राच्या खरेदीसाठी १७ कोटी ५० लाख रुपयांना प्रशासकीय मंजुरी मिळाली. विधिमंडळात चर्चाही झाली. परंतु आर्थिक तरतूद न झाल्याने हे दोन्ही यंत्र अद्यापही कागदावरच आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांच्या आरोग्याचा आधार म्हणून मेयोची गणना होते. सर्वांत मोठी आरोग्य यंत्रणा म्हणून ही संस्था विदर्भच नव्हे तर मध्य प्रदेश, छत्तीसगडच्या रुग्णांना आधार वाटते. मात्र येथील अपुऱ्या सोईसुविधा आणि अद्ययावत उपचार तंत्राच्या अभावामुळे रुग्णांसाठी नवे दुखणे ठरत आहे. आजची उपचार पद्धती ही तंत्रावर ठरत असताना या तंत्राच्या बाबती मात्र मेयो पिछाडीवर पडले आहे. रोगाचे अचूक निदान करताना अडथळे येत आहेत. गरिबांचा जीव धोक्यात आला आहे. या दोन्ही यंत्राच्या खरेदीसाठी मेयो प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी प्रस्ताव पाठविला होता. त्याला नोव्हेंबर २०१६ रोजी मंजुरी मिळाली. यात ‘१.५ टेस्ला एमआरआय’साठी १० कोटी तर ‘१२८ स्लाईस सिटी स्कॅन’साठी ७ कोटी ५० लाखांना प्रशासकीय मंजुरी मिळाली. तसे पत्रही प्राप्त झाले. नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात या यंत्राला घेऊन चर्चाही झाली. परंतु अद्यापही निधी मिळाला नाही. उलट एमआरआय व अद्ययावत सिटी स्कॅन नसल्याने रेडिओलॉजी विभागाच्या पदव्युत्तर (पीजी) पदविका अभ्यासक्रमाच्या ‘डीएमआरडी’ विद्यार्थ्यांच्या दोन जागा वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) रद्द केल्या. कधी थांबणार धावाधावमेयो रुग्णालयात दोन महिन्यांपासून सिटी स्कॅन बंद असून ‘एमआरआय’ही नसल्याने येथील रुग्णांना मेडिकलमध्ये पाठविले जाते. रोज आठ ते दहा रुग्णांवर अशी धावपळ करण्याची वेळ येते. परंतु मेडिकलमध्ये आधीच रुग्णांची गर्दी राहत असल्याने या रुग्णांवर कित्येक तासांची प्रतीक्षेची वेळ येते. अनेकवेळा रुग्णाला दुसऱ्या दिवसाची तारीख देऊन परत पाठविले जाते.