शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

श्री कलेक्शन व पार्लरला ठोकले सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:08 IST

नागपूर : महापालिकेच्या उपद्रवशोध पथकाने बुधवारी आशीनगर झोनमधील वैशालीनगर येथील एनआयटी चौकातील श्री कलेक्शन व हनुमाननगर झोनमधील म्हाळगीनगर ...

नागपूर : महापालिकेच्या उपद्रवशोध पथकाने बुधवारी आशीनगर झोनमधील वैशालीनगर येथील एनआयटी चौकातील श्री कलेक्शन व हनुमाननगर झोनमधील म्हाळगीनगर चौकातील सागर आइस्क्रीम पार्लर यांनी कोविड नियमांचे उल्लंघन केल्याने दोन्ही दुकाने सील केली.

महापालिकेने ३४ प्रतिष्ठानांवर कारवाई करून २ लाख ६८ हजारांचा दंड वसूल केला. पथकाने ५२ प्रतिष्ठाने व दुकानांची तपासणी केली. लक्ष्मीनगर झोनअंतर्गत चार प्रतिष्ठानांची तपासणी करून ६० हजारांचा दंड करण्यात आला. धरमपेठ विभागांतर्गत चार प्रतिष्ठानांची तपासणी करून ३० हजार, हनुमाननगर पथकाने तीन दुकानाची तपासणी करून १० हजार, धंतोलीच्या पथकाने १६ दुकानांची तपासणी १८ हजारांचा दंड वसूल केला. नेहरूनगर येथे चार प्रतिष्ठानांची तपासणी करून १५ हजार रुपये, गांधीबाग येथे सहा प्रतिष्ठानांची तपासणी करून ७० हजार रुपये, सतरंजीपुरा येथे तीन प्रतिष्ठानांची तपासणी करून ३० हजार रुपये दंड वसूल केला. लकडगंज पथकाने सात दुकानांची तपासणी करून १० हजार रुपये, आसीनगर पथकाने १२ प्रतिष्ठानांची तपासणी करून पाच हजार रुपये, तर मंगळवारी (दि. ११) झोन पथकाने तीन दुकानांची तपासणी करून २० हजार रुपयांचा दंड वसूल केला. महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रवशोध पथकप्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय शोधपथकांद्वारे ही कारवाई केली जात आहे.