शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

खासदार पुत्रावर अत्याचाराचा आराेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:13 IST

वर्धा : भाजपचे खासदार रामदास तडस यांचे पुत्र पंकज तडस याने लग्नाचे आमिष दाखवीत शारीरिक शोषण केल्याची तक्रार वर्धा ...

वर्धा : भाजपचे खासदार रामदास तडस यांचे पुत्र पंकज तडस याने लग्नाचे आमिष दाखवीत शारीरिक शोषण केल्याची तक्रार वर्धा शहरातील रहिवासी असलेल्या तरुणीने नागपूर येथील विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे केली आहे. यापूर्वी वर्धा येथील पोलीस अधीक्षकांकडेही याप्रकरणी तक्रार करण्यात आली होती. त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर हे प्रकरण आता कौटुंबिक न्यायालयात दाखल असल्याचे खा. रामदास तडस यांनी सांगितले आहे, तर पंकजने कोऱ्या कागदांवर सह्या घेऊन बनावट विवाहाचे चित्र उभे करीत आपली फसवणूक केली, असा आरोप पीडित मुलीने केला आहे.

खा. तडस यांचे पुत्र पंकज तडस याने वर्धा शहरातील एका मुलीसोबत सूत जुळविले होते. त्यानंतर दोघांनीही ६ ऑक्टाेबर २०२० राेजी विवाह केला. काही काळ ते वर्धा शहरात वास्तव्याला होते. त्यानंतर सदर पीडित मुलगी देवळी येथे तडस यांच्या घरीही राहण्यास गेली होती. मात्र, कालांतराने दोघांत वितुष्ट आल्याने हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. याप्रकरणी वर्धा पोलिसांनी चौकशी अहवालही तयार केला आहे. आता या प्रकरणात मुलीने पोलीस महानिरीक्षकांकडे धाव घेतली असून, या तक्रारीत गैरअर्जदार म्हणून पंकज तडस, खा. रामदास तडस व यांच्या पत्नी शोभा तडस, मुलगी सुनीता तडस यांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलीस महानिरीक्षक काय कार्यवाही करतात याकडे लक्ष लागले आहे.

पीडितेला त्रास दिलेला नाही

- तक्रारकर्त्या मुलीचे व पंकज यांचे लग्न झाले आहे. सदर मुलगी व पंकज काही काळ वर्धा येथे एकत्र राहत होते. त्यानंतर मुलगी देवळी येथे एकटी राहण्यासाठी आली. मुलगा पंकज हा वर्धेला राहत होता. दोघांत वितुष्ट आले. त्यामुळे याप्रकरणी मुलीने पोलिसांकडे तक्रार केली. पोलीस अधीक्षकांसमक्ष या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाली आहे, तर आता हे प्रकरण कौटुंबिक न्यायालयात दाखल आहे. आपल्या परिवाराने कुठलाही त्रास पीडितेला दिलेला नाही.

- रामदास तडस, खासदार, वर्धा

पंकजने कोऱ्या कागदांवर सह्या घेतल्या

- तक्रारकर्त्या मुलीशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता तिने आपली बाजू मांडली. ती म्हणाली, पंकजने बनावट विवाहाचे चित्र उभे केले. रोशन ठाकूर या मुलाच्या माध्यमातून शिव वैदिक विवाह संस्थेचे कोरे प्रमाणपत्र आणले. त्यावर माझ्या सह्या घेतल्या. याशिवाय काही कोऱ्या कागदांवर सह्या घेतल्या. नंतर त्या आधारावर नोटरी करून घेतली. नोंदणी पद्धतीने विवाह करण्यासाठी ही प्रोसीजर करीत असल्याचे सांगून एक महिन्यांनी रीतसर कोर्टातून लग्न करू, असे आश्वासन दिले. त्यामुळे आपण त्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली. यानंतर पंकज मला मोबाइलवर फोन करायचा. आपल्या फ्लॅटवर फ्रीज घेतला, टीव्ही घेतला, पडदे लावू अशी कारणे सांगून फ्लॅटवर येण्यास सांगायचा. मी नकार द्यायचे. आधी आपण सार्वजनिकरीत्या लग्न करू, समाजमान्यता मिळवू, असे मी त्याला सांगत होते. मात्र, शेवटी त्याच्या त्राग्याला कंटाळून मी दोन महिन्यांनी फ्लॅटवर गेले. काही दिवसांनी पंकज मला मारझोड करू लागला. शिव्या देऊ लागला. तू ठेवलेली बाई आहेस. मी म्हणेल तसे वागायचे असे सांगून धमकावू लागला. हे सर्व सहन करण्यापलीकडे गेल्यामुळे आपण तक्रार दाखल करण्याचे पाऊल उचलले, असेही तक्रारकर्त्या मुलीने सांगितले.