शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

वाळू तस्कर व धान्य साठेबाजांवर एमपीडीए

By admin | Updated: December 15, 2015 04:55 IST

वाळू तस्करी करणारे आणि धान्याची मोठी साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध आता एमपीडीएअंतर्गत कारवाई केली जाईल.

नागपूर : वाळू तस्करी करणारे आणि धान्याची मोठी साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध आता एमपीडीएअंतर्गत कारवाई केली जाईल. त्यांना एक वर्षासाठी स्थानबद्ध केले जाईल. यासंबंधीचे सुधारणा विधेयक सोमवारी विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले.गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक ६० महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधीद्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणऱ्या व्यक्ती (व्हिडिओ पायरेट्स)यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत (सुधारणा) विधेयक २०१५ सभागृहात मांडले. या विधेयकावर चर्चा करताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, जयंत पाटील, राजेश टोपे, शशिकांत शिंदे, अब्दुल सत्तार आदींनी काही शंका व्यक्त करीत या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी केली. तसेच या कायद्याचा दुरुपयोग होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन करताना सांगितले की, राज्यात वाळू माफिया मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. त्यांच्यावर फौजदारी करवाई केली जाते. दंड आकारला जातो. परंतु त्यातून त्यांचे फारसे बिघडत नाही. लोकांनाही त्याची माहिती असते. परंतु ते तक्रार करायला मागे-पुढे पाहतात. या कायद्यामुळे त्यांना एक वर्ष स्थानबद्ध केल्यास जरब बसेल. एमपीडीए हा प्रतिबंधात्मक कारवाई करणारा कायदा आहे. त्यातून गुन्हा होऊच नये, यासाठी तो वापरला जातो. या कायद्याचा दुरुपयोग होणार नाही, कारण एमपीडीए कायदा हा पूर्वीचाच आहे. त्यात फक्त दोन नवीन कॅटेगरीचा समावेश करण्यात आला आहे. धान्यसाठा करणाऱ्यांविरुद्ध मोकाअंतर्गत गुन्हा दाखल करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी गिरीश बापट यांचे अभिनंदनसुद्धा यावेळी केले.(प्रतिनिधी)राष्ट्रीय विधी विद्यापीठ सुधारणा विधेयकही मंजूर सोमवारी विधानसभेत महराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ सुधारणा विधेयक २०१५ आणि कॉलेजला परवानगी देणाऱ्या डॉ. नरेंद्र जाधव समितीला मुदतवाढ देणारे महराष्ट्र विद्यापीठ (दुसरी सुधारणा विधेयक) २०१५ हे सुद्धा मंजूर करण्यात आले. ही दोन्ही विधेयके शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सादर केली होती.