शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

मृत व्यक्तीच्या खात्यातील रकमेला फुटले पाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - मृत व्यक्तीच्या बँक खात्यातील रकमेला पाय फुटले. अज्ञात आरोपीने बनावट सह्या करून मृत व्यक्तीच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - मृत व्यक्तीच्या बँक खात्यातील रकमेला पाय फुटले. अज्ञात आरोपीने बनावट सह्या करून मृत व्यक्तीच्या खात्यातून साडेतीन लाख रुपये काढून घेतले. विशेष म्हणजे, ॲक्सिस बँकेच्या शंकरनगर शाखेत घडलेला हा फसवणुकीचा प्रकार तब्बल १० महिन्यांनंतर बँक अधिकाऱ्यांच्या लक्षात आली.

शाखा व्यवस्थापक जयराम प्रल्हाद घाटुरकर (वय ३८, रा. दिघोरी) यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीनुसार, ॲक्सिस बँकेच्या शंकरनगर शाखेत नंदराम रायपुरे यांचे बँक खाते आहे. त्यांची गॅस एजन्सी आणि अन्य व्यवसाय असल्याचे समजते. ते बरेचदा चेकने व्यवहार करायचे. त्यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले. अज्ञात आरोपींनी चेकवर बनावट सह्या करून रायपुरे यांच्या खात्यातून २३ नोव्हेंबर २०२० ते ३० जानेवारी २०२१ या कालावधीत ३ लाख ४४ हजार ५०६ रुपये काढून घेतले. आरोपीने बँक अधिकाऱ्यांच्या डोळ्यात सव्वादोन महिन्यात अनेकदा धूळफेक केली. त्यावेळी बँक अधिकाऱ्यांकडून सतर्कता दाखवण्यात आली नाही. तब्बल १० महिन्यांनंतर हा गैरप्रकार बँक अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सीताबर्डी ठाण्यात तक्रार नोंदवली.

-----

संपर्कातील व्यक्तींचा सहभाग?

पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल केला. या प्रकरणात चेकने व्यवहार झाल्यामुळे रायपुरे यांच्या संपर्कातील व्यक्तीचा सहभाग असावा, असा संशय आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

----