शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

मोगलकालीन नाण्यांवर चोरट्याचा डल्ला

By admin | Updated: September 15, 2016 02:27 IST

एका भांडीविक्रेत्याच्या कुटुंबाने पणजोबाच्या काळापासून जपून ठेवलेला मोगल आणि ब्रिटिशकालीन मौल्यवान नाण्यांचा ठेवा अज्ञात चोरट्याने लंपास केला.

पणजोबाच्या काळापासून जपला होता ठेवा भगवान श्रीरामाच्या राज्याभिषेकापासून ब्रिटिशकालीन नाणीनागपूर : एका भांडीविक्रेत्याच्या कुटुंबाने पणजोबाच्या काळापासून जपून ठेवलेला मोगल आणि ब्रिटिशकालीन मौल्यवान नाण्यांचा ठेवा अज्ञात चोरट्याने लंपास केला. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत तांडापेठ तुमडी मोहल्ल्यात घडलेली ही घटना बुधवारच्या सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास उजेडात आली. रवींद्र गणपतदास भामोडे (४२) यांच्याकडे ही घरफोडीची घटना घडली. त्यांचा इतवारी येथे भांडी विक्रीचा व्यवसाय आहे. भामोडे यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने त्यांनी तात्पुरत्या वास्तव्यासाठी बांधकाम सुरू असलेल्या घरासमोरच टिनाचे शेड उभारले आहे. मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास भामोडे कुटुंब गणपती दर्शनासाठी हिल टॉप, सीताबर्डी आणि महाल भागात गेले होते. रात्री १.३० वाजताच्या सुमारास घराकडे परतले होते. टिनाचे शेड असलेल्या घराला पुन्हा कुलूप लावून भामोडे हे कुटुंबासह बांधकाम सुरू असलेल्या घरी झोपण्यास गेले होते. आज सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास त्यांची पत्नी सारिका भामोडे या टिनाच्या शेडच्या घरात गेल्या असता त्यांना घरातील व आलमारीतील सामान अस्ताव्यस्त फेकलेले दिसले. अज्ञात चोरट्याने वाचनालयाच्या सज्जावरून टिन शेडमध्ये घुसून घरफोडी केल्याचे लक्षात येताच रवींद्र भामोडे यांनी लागलीच पाचपावली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. चोरट्याने आलमारीतून ५०० च्या २९ नोटा, मोगलकालीन, ब्रिटिशकालीन आणि भगवान श्रीरामाच्या राज्याभिषेकाची, लक्ष्मीची चांदीची १२४ नाणी, चांदीच्या चेन, हातातील आणि पायातील कडे, असा मोठा ठेवा लंपास केला. चोरी गेलेली नाणी १ किलो ८०० ग्रॅम वजनाची आहेत. पोलिसांनी या सर्व ऐवजाची किंमत केवळ २७ हजार ६०० रुपये आखली आहे.असा जपला होता प्राचीन ठेवारवींद्र भामोडे यांचे पणजोबा नारायणदास हे पट्टीचे पहिलवान होते. श्रीमंत रघुजीराजे भोसले यांनी बक्षीस म्हणून त्यांना २२५ चांदीची नाणी दिली होती. त्यापैकीच ही १२४ नाणी होती. त्यात काही अरबी लिपीचा उल्लेख असलेली मोगल काळातील नाणी होती. काही व्हिक्टोरिया राणीची ब्रिटिश काळातील नाणी होती. १९९७ मध्ये दिल्लीच्या एका व्यापाऱ्याने भामोडे यांना प्रत्येक नाण्यामागे तीन लाख रुपये देण्याचे कबूल करून ही नाणी विकत मागितली होती. हा आमच्या पूर्वजांचा ठेवा आहे, असे सांगून भामोडे यांनी नाणी विकण्यास नकार दिला होता. १९९२ मध्ये पुरातत्त्व विभागाने ऐतिहासिक ठेवा असल्याचे सांगून गणपतदास भामोडे यांना ही नाणी मागितली होती. ही नाणी आमच्या पूर्वजांची असून आम्ही दर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा करीत असतो, असे सांगून नाणी देण्यास नकार दिला होता. हल्ली दरवर्षी या नाण्यांची लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा केली जात होती. आंतराष्ट्रीय बाजारापेठेत ही नाणी मौल्यवान आहेत. रवींद्र भामोडे यांच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी अज्ञात चोराविरुद्ध भादंविच्या ३८० कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस चोरट्याचा कसून शोध घेत आहेत.