शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

गोहत्या करणा-यांना मोदीही वाचवू शकत नाहीत!- तोगडिया

By admin | Updated: October 24, 2015 11:17 IST

गोहत्या करणार्‍यांना पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील वाचवू शकत नाहीत, अशी धमकी विश्‍व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी दिली आहे.

 नागपूर: वादग्रस्त वक्तव्यांमुळे देशातील वातावरण तापले असतानाच 'गोहत्या करणार्‍यांना पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील वाचवू शकत नाहीत,' अशी इशारावजा धमकी देऊन विश्‍व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे.गोहत्या करून कुणीही भारतात राहू शकत नाही. गोहत्या करणार्‍यांनी या भ्रमात राहू नये की समाजवादी पार्टीचे नेते मुलायमसिंह यादव, मुख्यमंत्री अखिलेशसिंह यादव किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना वाचवतील, असे वक्तव्य तोगडिया यांनी शुक्रवारी केले. नागपूरहून दिल्ली येथे परतताना ते पत्रकारांशी बोलत होते. दादरी येथे घडलेली घटना व गोवंश हत्येवर त्यांनी आक्रमक भूमिका मांडली.तोगडिया म्हणाले, मुस्लिमांनी हिंदूंच्या भावनांचा आदर करावा व गोहत्या बंदीच्या आदेशाचे पालन करावे. जर कुणी या आदेशाचे पालन न करता हिंदूंच्या भावनांचा अपमान करण्याचा प्रयत्न करेल तर त्याला उत्तर दिले जाईल. मग हे उत्तर कुणाचे शांत पद्धतीने असेल तर कुणाचे हिंसक असेल. ते उत्तर देणार्‍यावर अवलंबून असेल. मात्र, अशा प्रकरणांची प्रतिक्रिया उमटेलच एवढे नक्की, असा थेट इशाराही त्यांनी दिला. राममंदिर निश्‍चितच उभारले जाईल, असा दावा करीत तोगडिया म्हणाले, जसे सोमनाथ मंदिर उभारताना सरदार पटेल यांनी कुणाचीही सहमती घेतली नव्हती. न्यायालयाकडे विचारणाही केली नव्हती; देशाच्या कॅबिनेटने निर्णय घेतला होता. आता राम मंदिरासाठी देशाच्या संसदेत कायदा तयार व्हावा. तोच राम मंदिर उभारण्याचा एकमेव मार्ग आहे. भाजपाकडे संसदेत बहुमत आहे. त्यामुळे भाजपाने कायदा बनवून राममंदिर उभारायला हवे, असेही तोगडिया म्हणाले.