शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

मॉडर्न आर्टला शिशिरने दिला नवा आयाम

By admin | Updated: October 28, 2014 00:28 IST

हुबेहूब चित्र साकारणे म्हणजे कला नव्हे तर त्यात वेगळेपण निर्माण करणे आणि पाहणाऱ्याला विचार करण्यास भाग पाडणे म्हणजे मॉडर्न आर्ट. अशाच मॉर्डन आर्टला नवा आयाम देण्याचा प्रयत्न नाशिकचा युवा

बर्लिनवरून निमंत्रण : दिल्लीच्या महाराष्ट्र सदनाला केले बोलतेरूपेश उत्तरवार - यवतमाळ हुबेहूब चित्र साकारणे म्हणजे कला नव्हे तर त्यात वेगळेपण निर्माण करणे आणि पाहणाऱ्याला विचार करण्यास भाग पाडणे म्हणजे मॉडर्न आर्ट. अशाच मॉर्डन आर्टला नवा आयाम देण्याचा प्रयत्न नाशिकचा युवा चित्रकार शिशिर शिंदे करीत आहे. त्याने साकारलेल्या चित्रांमुळे दिल्लीचे महाराष्ट्र सदन बोलके झाले असून त्याच्या चित्रांचे बर्लिन येथे लवकरच प्रदर्शन भरविले जाणार आहे.एका चित्रात हजार शब्दांचे सामर्थ्य असते. एखादे चित्र पाहिले की, काहीही सांगावे लागत नाही. सर्व काही आपोआप उमजते. अशा या कलेच्या क्षेत्रात नाशिकच्या एका तरुणाने स्वत:ला झोकून दिले आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचा चित्रकार म्हणून त्याने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. यवतमाळला आला असता त्याने मॉडर्न आर्ट आणि इतर चित्रशैलींबद्दल दिलखुलास गप्पा मारल्या. चित्रकारितेचा आजवरचा संपूर्ण प्रवास त्याने कथन केला. दिल्लीतील महाराष्ट्र सदनात दीडशे चित्र साकारले. महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती आणि पर्यटनाचे प्रतिबिंब उमटविणारे ते चित्र बघून महामहीम राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही शिशिरचे कौतुक केले. सचिन तेंडूलकरने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली त्यावेळी मोठ्या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. क्रिकेट बोर्डाने सचिनला सोने किंवा चांदीची बॅट देण्याचा निर्णय घेतला. मात्र सचिनने त्याला नकार दिला. त्याऐवजी सुंदर चित्राला पसंती दिली. त्यासाठी देशातील ७०० चित्रकारांनी वेगवेगळे चित्र पाठविले. त्यात शिशिरचे चित्र निवडले गेले. राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांच्या हस्ते सचिनला हे चित्र प्रदान करण्यात आले. तो आपल्यासाठी आयुष्यातील अविस्मरणीय क्षण होता असे शिशिर म्हणाला. मुंबई, पुणे, दुबई, फ्रान्स येथे त्याच्या चित्रांचे प्रदर्शन झाले आले. लवकरच बर्लिन येथेही त्याचे चित्रप्रदर्शन भरविले जाणार आहे. कुठल्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर आत्मविश्वास बाळगून मनापासून काम करा, असा संदेश त्याने शेवटी युवकांना दिला. खासदार विजय दर्डांना चित्र भेट यवतमाळात आला असता शिशिरने लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन खासदार विजय दर्डा यांना स्वत:ची एक चित्रकृती भेट दिली. चित्रकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले ते चित्र आणि त्याची चित्रकलेतील साधना पाहून खासदार दर्डा यांनी त्याचे कौतुक केले.