शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल चोरणारी आंतरराज्यीय टोळी

By admin | Updated: December 7, 2015 06:35 IST

शहरात मोबाईल चोरणारी आंतरराज्यीय टोळी सक्रिय असून या टोळीचा सदस्य अलेला एक १० वर्षीय मुलगा

नागपूर : शहरात मोबाईल चोरणारी आंतरराज्यीय टोळी सक्रिय असून या टोळीचा सदस्य अलेला एक १० वर्षीय मुलगा पाचपावली पोलिसांच्या हाती लागला आहे. त्याच्याजवळून ८० हजार रुपये किमतीचे मोबाईल जप्त करण्यात आले. तो सापडल्याचा सुगावा लागताच टोळीच्या मुख्य सूत्रधारासह तिघे फरार झाले. शनिवारी सकाळी गस्त घालताना पोलिसांना एक मुलगा मोतीबाग रेल्वे क्वॉर्टर बाजारात संशयास्पद अवस्थेत फिरताना आढळून आला. त्याची विचारपूस केली असता त्याच्याजवळ आठ मोबाईल सापडले. त्याने ते मोबाईल बाजारातून चोरल्याचे कबूल केले. त्याचे इतर साथीदार बाजरातच फिरत होते. पोलिसांनी मुलाला पकडल्याचे लक्षात येताच ते फरार झाले. पोलिसांच्या हाती सापडलेला अल्पवयीन मुलगा व त्याचे टोळीतील इतर साथीदार हे झारखंडचे रहिवासी आहेत. ही टोळी लहान मुलांच्या माध्यमातून चालविली जाते. अल्पवयीन मुलगा ‘मोबाईल लिफ्टर’ असतो. ही टोळी साप्ताहिक बाजारात फिरून मोबाईल चोरतात. खाली वाकून भाजी किंवा इतर साहित्य खरेदी करताना व्यस्त असलेल्या व्यक्तीच्या बाजूला ही मुले उभी राहतात आणि मोबाईल चोरतात. मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात येतपर्यंत तो दूरवर निघून गेलेला असतो. या टोळीतील सदस्य मोबाईल चोरणाऱ्या मुलाच्या आजूबाजूलाच उभे असतात. धोका लक्षात येताच ते सामान्य नागरिकांसारखे समोर येऊन मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करतात. सापडल्यावर मुलगा रडून क्षमा मागत असल्याने ही टोळी हाती लागत नाही. सापडलेल्या अल्पवयीन मुलाने एका महिन्यापूर्वीच या टोळीत सहभागी झाल्याचे सांगितले. त्याने सांगितल्यानुसार शाळेत जाण्यासाठी आईने रागावल्यामुळे तो संतापून या टोळीसोबत नागपूरला निघून आला. या टोळीतील सदस्यही त्याच्या गावातीलच राहणारे आहेत. या टोळीने महिनाभरापूर्वी यशोधरानगर येथील कांजी हाऊस चौकात आपले बस्तान मांडले आहे. ते हॉटेल किंवा फुटपाथवर रात्र घालवितात. येथे त्यांचा धंदा चालत असल्याने ते भाड्याने घर घेण्याच्या तयारीत होते. परंतु अल्पवयीन मुलगा सापडल्याने ते फरार झाले. मुलगा दिशाभूल करीत असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याला बाल सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. ही कारवाई ठाणेदार राजेंद्र निकम, पीएआय मनीष गावंडे, एएसआय उल्हास पवार, हवालदार अनिल ठाकूर, नायक शिपाई राजेश देशमुख, रोशन तिवारी, प्रदीप पवार आणि ज्ञानेश्वर जाधव यांनी केली. (प्रतिनिधी)