शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

‘मोबाईल लॅब’ ठरतेय वरदान

By admin | Updated: May 11, 2015 02:18 IST

उपराजधानीच्या वैज्ञानिक विकासात मोलाचा वाटा उचलणाऱ्या ‘नीरी’तर्फे (नॅशनल एन्व्हायर्नमेन्टल इंजिनिअरींग रिसर्च इन्स्टिट्यूट)..

नागपूर : उपराजधानीच्या वैज्ञानिक विकासात मोलाचा वाटा उचलणाऱ्या ‘नीरी’तर्फे (नॅशनल एन्व्हायर्नमेन्टल इंजिनिअरींग रिसर्च इन्स्टिट्यूट) शहरातील कुठल्या भागांत नेमके जास्त वायुप्रदूषण आहे याचा अभ्यास करण्यासाठी मागील वर्षी ‘मोबाईल लॅब’ची निर्मिती करण्यात आली होती. ही ‘लॅब’ संशोधनासाठी प्रचंड फायदेशीर ठरत असून या माध्यमातून शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये गर्दीच्या वेळी वायुप्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्नदेखील करण्यात येत आहेत. गेल्या काही काळापासून देशातील मोठ्या शहरांप्रमाणे नागपुरातदेखील वायुप्रदूषणाची पातळी वाढीस लागली आहे. याचा अभ्यास करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान व उपकरणांनी युक्त अशा या ‘लॅब’ मधील छोटेखानी प्रयोगशाळेच्या माध्यमातून शहरातील निरनिराळ्या ठिकाणी हवेतील घातक वायूंची नोंद घेण्यात येत आहे.‘मोबाईल एमिशन मॉनिटरींग अ‍ॅन्ड कंट्रोल लेबॉरेटरी’ असे नाव असलेल्या या‘लॅब’मध्ये वातावरणातील निरनिराळ्या वायूंच्या घटकांची माहिती लगेच उपलब्ध व्हावी अशी यंत्रणा यात उभारण्यात आली आहे. या अभ्यासातून कुठल्या भागात वायूप्रदूषण जास्त प्रमाणात आहे व कुठे तत्काळ दखल घेण्याची आवश्यकता आहे ही बाब अधोरेखित करणे शक्य झाले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या ‘मोबाईल लॅब’च्या माध्यमातून शहरातील विविध चौकांमध्ये गर्दीच्या वेळेस कुठल्या घातक वायूंचे प्रमाण जास्त असते याची आकडेवारी गोळा करण्यात येत आहे. अनेकदा ‘लॅब’मधील काही उपकरणांच्या माध्यमातूनच हे कार्य करण्यात येते. लवकरच या आकडेवारीचे विश्लेषण करण्यात येणार आहे. या ‘मोबाईल लॅब’मुळे ‘नीरी’च्या संशोधकांना अचूक व वेगवान पद्धतीने वायुप्रदूषणाचा ‘डेटा’ मिळत आहे. काही ठिकाणी गर्दीच्या वेळी वायुप्रदूषण कमी करण्याचादेखील प्रयत्न या ‘मोबाईल लॅब’च्या माध्यमातून करण्यात येत आहे. शहरातील वायुप्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांसाठी ही माहिती फारच उपयुक्त ठरणार आहे. लवकरच या माध्यमातून शहरातील सर्वात प्रदूषित पट्टे व चौक यांची नावे समोर येतील, अशी माहिती ‘नीरी’च्या संशोधकांनी दिली. वायुप्रदूषणाचा अभ्यास करणारी ही ‘मोबाईल लॅब’ एका छोटेखानी बसमध्ये उभारण्यात आली आहे. यातील ‘इएमयू’ (एमिशन मॉनिटरींग युनिट) व ‘इसीयू’ (एमिशन कंट्रोल युनिट) हा महत्त्वाचा भाग आहे. शिवाय ‘ग्रीन हाऊस गॅसेस’, ‘सीएफसी’ (क्लोरोफ्लुरोकार्बन्स) आणि इतर ५० प्रकारच्या घातक वायूंची तपासणी करण्यासाठी ‘एफटीआयआर’ (फोरियर ट्रान्सफॉर्म इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कॉपी’देखील या ‘लॅब’मध्ये उपलब्ध आहे. (प्रतिनिधी)