शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचाराच्या घटनेनंतर अल्पवयीन मुलीचा विनयभंग

By admin | Updated: January 21, 2017 02:42 IST

रेल्वेत एका अल्पवयीन मुलीची फसवणूक करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या एका आरोपीस आणि त्याला सहकार्य करणाऱ्या मित्राला गुरुवारी लोहमार्ग पोलिसांनी अटक केली होती.

गुन्हा दाखल : नागपूर लोहमार्ग पोलिसांकडे तपास नागपूर : रेल्वेत एका अल्पवयीन मुलीची फसवणूक करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या एका आरोपीस आणि त्याला सहकार्य करणाऱ्या मित्राला गुरुवारी लोहमार्ग पोलिसांनी अटक केली होती. ही घटना ताजी असतानाच दुसऱ्याच दिवशी विदर्भ एक्स्प्रेसमध्ये एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी एका अनोळखी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी सायंकाळी ५ वाजता विदर्भ एक्स्प्रेस नागपूर रेल्वेस्थानकावर आली. या गाडीत एक महिला आणि तिची १२ वर्षाची अल्पवयीन मुलगी जनरल कोचमध्ये अकोल्याला जाण्यासाठी बसल्या. याच कोचमध्ये एक अनोळखी युवक होता. बसण्यावरून संबंधित महिला आणि त्या युवकाची बाचाबाची झाली. नागपुरातून गाडी सुटल्यानंतर खापरी ते बुटीबोरी दरम्यान संबंधित युवकाने या महिलेच्या अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला. मुलीने घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर महिलेने या युवकाची चांगलीच खरडपट्टी काढली. अकोला रेल्वेस्थानक आल्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्याची धमकीही दिली. सहप्रवाशांनीही या युवकाची कानउघाडणी केली. त्यानंतर कारवाईच्या धास्तीने हा युवक मध्येच कोणत्यातरी रेल्वेस्थानकावर उतरला. अकोल्याला विदर्भ एक्स्प्रेस पोहोचल्यानंतर संबंधित महिलेने अज्ञात युवकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी विदर्भ एक्स्प्रेसच्या जनरल कोचची तपासणी केली असता त्यात एक अनोळखी बॅग सापडली. ही बॅग त्याच युवकाची असेल अशी शंका आल्यामुळे बॅगमधील कागदपत्रांवरून लोहमार्ग पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अकोला लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून घटनास्थळ नागपूर लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत असल्यामुळे हे प्रकरण नागपूरला पाठविले आहे. लोहमार्ग पोलीस निरीक्षक अभय पान्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)