शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:च्याच आदेशाचा मनपाने उडविला फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:07 IST

राजीव सिंह लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील नागरिकांना कोविड नियमांचे पालन करण्याचा सल्ला देणारे मनपातील पदाधिकारी व अधिकारी ...

राजीव सिंह

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहरातील नागरिकांना कोविड नियमांचे पालन करण्याचा सल्ला देणारे मनपातील पदाधिकारी व अधिकारी परिवहन सेवेबाबत उदासीन आहेत. सध्या मनपा प्रशासनाने जारी केलेल्या आदेशानुसार आसन क्षमतेनुसार बसमध्ये प्रवाशांना बसण्याची मुभा दिली आहे. परंतु शहरातील अनेक मार्गावर बसफेऱ्या कमी असल्याने प्रवाशांना नाईलाजास्तव बसमध्ये उभ्याने प्रवास करावा लागत आहे. कंडक्टर बसमध्ये चढू देत नाही. परंतु आवश्यक ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांना जोखीम स्वीकारावी लागत आहे. शहरात २०० बस धावत आहेत. नियमांचे पालन करण्यासाठी मनपा प्रशासनाला बसच्या फेऱ्यात वाढ करावी लागेल.

सध्या शहरातील संक्रमण दर एक टक्क्याच्या खाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या एक हजारापेक्षा कमी आहे. शनिवारी शहरात फक्त आठ पॉझिटिव्ह मिळाले. संयम व नियमांचे पालन केल्याने हे शक्य झाले. यामुळे शहरातील नागरिकांचे हित लक्षात घेता, परिवहन सेवेकडे मनपा प्रशासनाला लक्ष द्यावे लागेल. बसफेऱ्यात वाढ करून ३०० हून अधिक बस करण्याची नितांत गरज आहे. सोमवारी कोचिंग संस्थांसह अन्य सेवांची वेळ वाढविण्यात आली आहे. याचा विचार करता बस संख्या वाढवावी लागेल. अन्यथा बसमध्ये गर्दी झाल्यास कोरोना संक्रमणाचा गंभीर धोका आहे. बसमधून प्रवास करणारे प्रवासी मास्क व सॅनिटायझरचा वापर करीत आहेत. आता मनपा प्रशासनाला आपली जबाबदारी पार पाडावी लागेल.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसापूर्वी ऑरेंज सिटी स्ट्रीट डेपोतून ६५, पटवर्धन मैदानातून ६५, खापरी डेपोतून ३८, कोराडी डेपोतून २६ व मातृशक्तीमधून ६ बसचे संचालन करण्यात आले.

...

सकाळ व संध्याकाळी गर्दी

कार्यालयात येण्याच्या व परत जाण्याच्या वेळेला बसमध्ये गर्दी वाढत आहे. काही मार्गावर बस संख्या वाढविण्याची नितांत गरज आहे. सकाळी व संध्याकाळच्या सुमारास बसमधील प्रवासी वाढतात. यामुळे अनेक प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागतो. मनपाला आपल्या आदेशाचे पालन करण्यासाठी बसची संख्या वाढवावी लागेल. टप्प्याटप्प्याने बस संख्या वाढविण्यात येणार असल्याची माहिती मनपाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

...

या मार्गावर अधिक फेऱ्या

बर्डी ते हिंगणा, बुटीबोरी, पारडी, खापरखेडा, पिपळा फाटा, डिफेन्स आदी मार्गावर अधिक बस धावत आहेत. परंतु बाजार भागातील बसची संख्या अजूनही कमी आहे. त्यात दोन बसच्या ये-जामधील अंतर अधिक आहे. दुसरीकडे बर्डी-हिंगणा ग्रामीण रुग्णालयादरम्यान १५, बर्डी-डिफेन्सदरम्यान १०,बर्डी-इंडोरमा गेटदरम्यान १५, बर्डी-खापरखेडा ११, बर्डी-ब्राम्हणी फाटा ११, पारडी-जयताळा व्हाया महालदरम्यान ९, पिपळा फाटा-हजारी पहाड दरम्यान ९ यासह अन्य काही मार्गावर बस धावत आहेत.