शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मनसर परिसरात मॉईलचा एक हजार कोटींचा प्रकल्प

By admin | Updated: October 24, 2015 03:21 IST

मनसर- खापा परिसरात मोठ्या प्रमाणात मॅगनीजच्या खाणी आहेत. मात्र, मॅगनीजवर प्रक्रिया करणारे प्रकल्प या भागात नाहीत.

कृपाल तुमाने : आठ हजार युवकांना रोजगारनागपूर : मनसर- खापा परिसरात मोठ्या प्रमाणात मॅगनीजच्या खाणी आहेत. मात्र, मॅगनीजवर प्रक्रिया करणारे प्रकल्प या भागात नाहीत. मॉईलने मॅगनीजवर प्रक्रिया करून फेरोअलाय तयार करण्याचा प्रकल्प भिलाई येथे उभारण्याची तयारी चालविली होती. येथील वीज दर जास्त आहेत, अशी त्यांची तक्रार होती. मात्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आपण स्वत: व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठक घेतली. त्यानंतर राज्य सरकारने कमी दरात वीज उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविल्यामुळे आता मॉईल याच परिसरात एक हजार कोटींचा प्रकल्प उभारणार आहे. यामुळे सुमारे ८ हजार युवकांना रोजगार मिळेल, अशी माहिती रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी दिली.नागपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.तुमाने म्हणाले, नागपूर जिल्ह्यात पाहिजे त्या प्रमाणात औद्योगिकीकरण झालेले नाही. मौदा,हिंगणा एमआयडीसीमध्ये काही प्रमाणात उद्योग सुरू आहेत. बुटीबोरी या पंचतारांकित एमआयडीसीमधील बहुतांश उद्योग बंद आहेत. हे चित्र बदलायचे आहे. मौदा- रामटेक रोडवर अल्ट्राटेक सिमेंट कंपनी उद्योग उभारत आहे. मात्र, उद्योग उभारणीसाठी आपण सहकार्य करतो, परवानगी देतो व बिहार, उत्तर प्रदेशातील कामगारांना येथे कामावर घेतले जात असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ही सिमेंट कंपनी सुरू करताना नागपूर जिल्ह्यातील रहिवाशांची भरती करावी, अशी मागणी करण्यात आली असून कंपनीने ते मान्य केले आहे. रामटेक गड मंदिराच्या विकासासाठी माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांनी १०० कोटींचा प्रस्ताव मंजूर झाल्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात एक रुपयाही मंजूर झाला नाही. विभागीय आयुक्तांच्या कमिटीपुढे प्रस्ताव सादर केल्यानंतर विकासासाठी ६ कोटी रुपये मिळाल्याचे त्यांनी सांगितले. अमरावतीवरून मुंबई- पुण्यासाठी रेल्वे गाड्या सुटतात. या गाड्या नरखेडवरून सोडण्यात याव्यात, नागपूरहून दिल्लीला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना नरखेड येथे थांबा द्यावा, सव्वा लाख लोकसंख्या असलेल्या बुटीबोरी येथे रेल्वे तिकीट रिझर्व्हेशन काऊंटर द्यावे. नागपूर- रामटेक पॅसेंजर गाडी बुटीबोरीपर्यंत वाढवावी आदी मागण्या सेंट्रल रेल्वेच्या बैठकीत करण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)