शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

मनरेगा कर्मचाऱ्याचा रामगिरीवर मोर्चा

By admin | Updated: August 28, 2016 02:25 IST

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे कर्मचारी आणि ग्रामरोजगार सेवकांना नोकरीचे स्थायीत्व आणि सुरक्षेची

नोकरीची सुरक्षा देण्याची मागणी : पाच हजार आंदोलनकर्ते सामीलनागपूर : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे कर्मचारी आणि ग्रामरोजगार सेवकांना नोकरीचे स्थायीत्व आणि सुरक्षेची हमी मिळावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य मनरेगा कर्मचारी संघटना व ग्रामरोजगार सेवक संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी यशवंत स्टेडियम येथून मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी निवासस्थानावर मोर्चा काढला होता. या मोर्च्यात राज्यभरातून आलेले ५००० च्या जवळपास आंदोलनकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनाचे नेतृत्व मनरेगा कर्मचारी संघटनेचे राज्य सचिव ओंकार जाधव, सरचिटणीस राजन क्षीरसागर, उपाध्यक्ष संतोष राठोड यांनी केले. लोकमतशी बोलताना संतोष राठोड यांनी सांगितले की, मनरेगाचे अनेक कर्मचारी गेल्या दहापेक्षा जास्त वर्षापासून या योजनेंतर्गत सेवा देत आहेत. यातील बहुतेकांनी नोकरीची वयोमर्यादा ओलांडली आहे. मात्र कंत्राटी तत्त्वावर काम करीत असल्याने त्यांना नोकरीची कुठलीही हमी मिळत नाही. शिवाय शासकीय सेवा सवलतीही मिळत नाही. अचानक नोकरीवरून काढण्यात येत असल्याने कुटुंबाच्या पोषणाचा प्रश्न निर्माण होतो. ग्रामरोजगार सेवकांनाही सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. निवडणुकीनंतर ग्रामपंचायतीची टीम बदलली की, रोजगार सेवकालाही काढण्यात येते. सरकारने या कर्मचाऱ्यांचा अनुभव गृहीत धरून त्यांच्या कायम नोकरीची हमी देण्याचा निर्णय घ्यावा. संघटनेच्यावतीने सर्व कंत्राटी नरेगा कर्मचाऱ्यांसाठी एकसमान धोरण लागू करावे, या योजनेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांना नोकरीची हमी देण्यात यावी, मग्रारोहच्या कामासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्य करावी, सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय योजनेनुसार वेतन देण्यात यावे, कामाचा विचार करून बढती मिळावी, नरेगा कर्मचाऱ्यांना कामाचे अधिकार मिळावे, कर्मचाऱ्यांची सेवापुस्तिका तयार करण्यात यावी आणि ग्रामरोजगार सेवकांना दरमाह १० हजार रुपये वेतन लागू करावे आदी मागण्या करण्यात आल्या. पोलिसांनी मोर्चाला संविधान चौकात थांबविले. या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी सभा घेतली. यानंतर प्रतिनिधी मंडळाने नरेगा आयुक्त कार्यालयात जाऊन उपायुक्तांशी भेट घेतली व मागण्यांचे निवेदन सोपविले.(प्रतिनिधी)