नागपूर : मेट्रो रेल्वेच्या कामास गती येण्यासाठी हिंगणा रोडवरील एसआरपीएफची २६ हेक्टर जागा, टी पॉर्इंट येथील वॉर्डन रेसिडेन्सीची २५०० स्क्वेअर मीटर आणि यशवंत स्टेडियम जवळील १९ हजार ९०० स्क्वेअर मीटर जागा मेट्रो रेल्वेला गेल्या ४ आॅगस्ट रोजी आगाऊ हस्तांतरित करण्यात आली, अशी माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली. कस्तूरचंद पार्कसमोरील महराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची जागा व सीताबर्डी येथील टेक्निकल हायस्कूलच्या जागेचा आगाऊ ताबा येत्या सोमवारी देण्यात येईल, एसआरपीएफला वायफळ येथील ६० हेक्टर जागा पर्यायी म्हणून देण्यात आली आहे. या जागेला स्थानिक एसआरपीएफनी पसंती कळविली असल्याचेही जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मेट्रो रेल्वेला मिळाली जागा
By admin | Updated: August 8, 2015 02:54 IST