शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग वापरकर्त्यांना नवीन वर्षात मोठे गिफ्ट! १ फेब्रुवारीपासून 'KYV' ची कटकट संपणार; NHAI चा मोठा निर्णय
2
एक चूक आणि बँक अकाउंट रिकामं! सायबर फसवणूक करणाऱ्यांच्या ५ पद्धती जाणून घ्या अन् काळजी घ्या
3
नैनीतालमध्ये गर्लफ्रेंडसोबत फिरत होता नवरा, अचानक समोर आली बायको; मग जे झालं...
4
१ फेब्रुवारी २०२६ पासून सिगरेट महागणार, कोणत्या Cigarette ची किती वाढणार किंमत?
5
निसर्गाचा कोप! अफगाणिस्तानात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार; १७ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील ५ जण गाडले गेले
6
Indian Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,४२० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
7
२०२६चा पहिला गजकेसरी राजयोग: ८ राशींना सुबत्ता, पद-पैसा वाढ; लक्षणीय यश, ३ दिवस वरदान काळ!
8
एअर इंडियाच्या पायलटचा कॅनडात 'हायव्होल्टेज' ड्रामा; उड्डाणापूर्वीच झिंगला, मग जे घडलं ते धक्कादायक!
9
२०२६ची पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी: ३ गोष्टी करा, बाप्पा संकट दूर करेल; सगळे मनासारखे होईल!
10
कर महसुलात महाराष्ट्रच ‘किंग’; देशाच्या एकूण तिजोरीत २२% वाटा एकट्या महाराष्ट्राचा
11
‘फॅमिली फर्स्ट’! शिंदेसेनेच्या मुंबईतील उमेदवारांत नेत्यांच्या नातेवाईकांचाच भरणा; माजी आमदार चक्क नगरसेवक पदासाठी रिंगणात 
12
कर्जाच्या जाळ्यात अडकली तरुणाई, विना गॅरंटी कर्जाची थकबाकी वाढतेय; बँकांवर ताण - आरबीआय
13
फडणवीस-शिंदे यांचा उद्या मुंबईत संयुक्त मेळावा, मुंबई महापालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फुटणार
14
ग्रंथदिंडीतून साहित्याचा जागर; तब्बल ५६ चित्ररथांच्या दोन किलोमीटर ग्रंथदिंडीने फेडले डोळ्याचे पारणे
15
आजचे राशीभविष्य २ जानेवारी २०२६ : नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आजचा मुहूर्त उत्तम
16
महापालिका निवडणूक : मिशन 'थंड'खोरी! आमचे काय चुकले..? निष्ठावंतांचा सवाल
17
बंडोबांना थंड करून बिनविरोध निवडीचा नवा फंडा; मांडवली, पदांचे आमिष नाहीतर...; काही बंडखोर अज्ञात स्थळी रवाना 
18
‘मी कुठे चुकले, प्रश्न विचारण्याचा मला हक्क’; भाजपच्या इच्छुक उमेदवाराचा घरचा आहेर
19
‘शिंदेसेनेचे उमेदवार बिनविरोध यावे म्हणून विरोधकांचे उमेदवारी अर्ज करताहेत बाद’
20
मला मराठीचा आदर, मुंबईचा महापौर मराठीच होणार; भाजपनेते कृपाशंकर सिंह यांनी अखेर नमते घेतले
Daily Top 2Weekly Top 5

पद्धत सारखीच, आमिषही एकसारखेच!

By admin | Updated: May 11, 2014 01:23 IST

उजेडात आलेल्या सर्व घोटाळेबाजांची पध्दत एकसारखीच आहे. अल्पावधीत दामदुप्पट व्याजाचे आमिष दाखवून त्यांनी सर्वसामान्यांची रक्कम स्वत:च्या ड्रॉवरमध्ये वळती केली.

नागपूर : उजेडात आलेल्या सर्व घोटाळेबाजांची पध्दत एकसारखीच आहे. अल्पावधीत दामदुप्पट व्याजाचे आमिष दाखवून त्यांनी सर्वसामान्यांची रक्कम स्वत:च्या ड्रॉवरमध्ये वळती केली. जास्तीत जास्त गुंतवणूकदार आणि त्यांची रक्कम उकळण्यासाठी या सर्वांनी अनेक दलाल नेमले. कमिशन मिळवण्यासाठी या दलालांनी आपल्या नातेवाईकांच्याच कमाईवर डल्ला मारला आणि त्यांची आयुष्याची कमाई या घोटाळेबाजांच्या हवाली केली. तीन वर्षात तीन हजार कोटींचे घोटाळे २०१३ मध्ये नागपूर-विदर्भच नव्हे तर महाराष्टÑात खळबळ उडवून देणारा श्री सूर्या समूहाचा घोटाळा उजेडात आला. समीर जोशी या थंड डोक्याच्या गुन्हेगाराने ठिकठिकाणच्या गोरगरीब आणि श्रीमंत, अतिश्रीमंतांना आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून १००० कोटींपेक्षा जास्त रुपये गोळा केले. या रकमेतून त्याने ठिकठिकाणी ऐशोआरामाची व्यवस्था करवून ठेवली. मोठमोठे मॉल, कार्यालये, बहुमजली इमारती, फॉर्म हाऊस, आलिशान सदनिका विकत घेतल्या अन् गुंतवणूकदारांना ठेंगा दाखवला. १४ सप्टेंबर २०१३ ला त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले. नागपूर पोलिसांनी समीर आणि पल्लवीला फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक केली अन् कारागृहात डांबले. नंतर अमरावती, अकोला, पुणे आदी शहरातही जोशी दाम्पत्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले. सात महिन्यांपासून त्यांची जेलयात्रा सुरू आहे. सर्वसामान्यांना धडकी भरविणारे हे घोटाळे ताजे असतानाच आता वासनकर समूहाच्या बोगसबाजीचा खुलासा झाला आहे. अल्पावधीत दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून प्रशांत वासनकर, त्याचे नातेवाईक आणि चेल्याचपाट्यांनी ४ ते ५ हजार गुंतवणूकदारांकडून सुमारे १५०० कोटी रुपये गोळा केले. नियोजित अवधीनंतर या गुंतवणूकदारांनी आपली रक्कम परत मागितली असता त्याने टाळाटाळ केली. गेल्या वर्षभरापासून तो टालमटोल करीत असल्यामुळे अखेर दोन दिवसांपूर्वी विवेक पाठक यांनी गुन्हेशाखेत तक्रार दिली. पोलिसांनी शुक्रवारी त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले. उपराजधानीत यापूर्वी अमन आणि राजश्री हेमानी यांचा १५० ते २०० कोटींचा घोटाळा, जिल्हा बँकेचा पावणेदोनशे कोटींचा घोटाळा उघड झाला आहे. गेल्या वर्षी दिल्ली पोलिसांनी उल्हास खरे नामक महाठगाला जेरबंद केले. हा उल्हास नागपूरच्या लक्ष्मीनगर चौकातील रहिवासी असून, त्याने देशभरातील हजारो गुंतवणूकदारांना ५ हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांनी गंडविल्याची चर्चा होती. बदलती ओळख इंग्रज राजवटीत शून्य मैल (झिरो माईल) मुळे देशाचे हृदयस्थान अशी नागपूरची ओळख देशविदेशात रुजली. महान सुफी संत आणि सर्वधर्मसमभावाचे प्रतीक बाबा ताजुद्दीन यांच्यामुळे बाबांचे शहर म्हणून नागपूर देशविदेशात ओळखले जाऊ लागले. संघ मुख्यालय आणि दीक्षाभूमीमुळे नागपूरची वेगळी ओळख निर्माण झाली. संत्र्याचे शहर म्हणूनही नागपूर सर्वत्र ओळखीचे ठरले. अलीकडे मिहान प्रकल्पाने नागपूरला देशतील वेगाने विकसित होणारे शहर म्हणून नवी ओळख दिली. यासोबतच दरवर्षी नागपुरात उजेडात येणार्‍या शहराने आता नागपूरवर घोटाळ्याचे शहर म्हणूनही बोट ठेवले जात आहे.