शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

वाट्टेल तेव्हा लिंक टाकून मिटिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:07 IST

नागपूर : शाळा बंद असल्या तरी शिक्षण विभागाच्या बैठकांमुळे शिक्षक बेजार झाले आहेत. केंद्रप्रमुखापासून उपसंचालकापर्यंत वाटेल त्याला ऑनलाईन बैठका ...

नागपूर : शाळा बंद असल्या तरी शिक्षण विभागाच्या बैठकांमुळे शिक्षक बेजार झाले आहेत. केंद्रप्रमुखापासून उपसंचालकापर्यंत वाटेल त्याला ऑनलाईन बैठका घेऊन शिक्षकांचा मनस्ताप वाढवीत आहे. शाळा बंद आहे, विद्यार्थी घरात आहे. पण ऑनलाईन स्वाध्याय, करिअर गायडन्स ॲप यासंदर्भात त्याच त्या बैठका होत असल्याच्या तक्रारी शिक्षकांच्या आहेत. बैठकांचा वेळही निश्चित नाही, अधिकाऱ्यांना वाटेल तेव्हा लिंक टाकून बैठकांचे आयोजन करण्यात येत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.

या सर्वात मोठी गोची मुख्याध्यापकांची होत आहे. संस्था मुख्याध्यापकांना वेगळे नाचवते, शिक्षण विभागाकडून वेगळे आदेश देण्यात येतात. शिक्षकांनी दिलेले काम न केल्यास मुख्याध्यापकांना टार्गेट केले जाते. मीटिंग कुणी घ्याव्यात, याचेही नियोजन नाही, केंद्रप्रमुखापासून उपसंचालक कार्यालयापर्यंत ज्या वाटेल, तो बैठकी घेत असल्याची ओरड शिक्षक करीत आहेत. सध्या शिक्षकांना डायटवाल्यांनी ऑनलाईन स्वाध्याय आणि करिअर गायडन्स अ‍ॅपवरून ग्रामीण भागातील शाळांना चांगलेच बेजार केले आहे. स्वाध्याय व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप विद्यार्थ्यांनी जॉईन करावा, यासाठी तगादा लावला जात आहे. शनिवारी बैठक घेतात आणि सोमवारी विद्यार्थ्यांची आकडेवारी मागतात, त्यामुळे शिक्षक, मुख्याध्यापक वैतागले आहेत. डायटच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेतल्यानंतर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख हे सुद्धा याच विषयावर बैठकी घेत आहेत. वरून काही माहिती मागितली की, पंचायत समितीस्तरावरील अधिकारी शिक्षकांच्या मागे तगादा लावून सोडत आहेत.

विशेष म्हणजे कुणी झूमवर बैठका घेत आहे. काही वेबेक्स डाऊनलोड करायला लावत आहे. काही बैठका गुगल अ‍ॅपवर घेतल्या जात आहेत. हे सर्व अ‍ॅप शिक्षकांनी डाऊनलोड केले आहे. विशेष म्हणजे अनेक शाळांनी ऑनलाईन वर्ग सुरू केले आहे. त्यांचे टामटेबल आखण्यात आले आहे. याचवेळी अधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र असल्याने, शिक्षकांचे ऑनलाईन वर्गाकडे दुर्लक्ष होत आहे.

- ग्रामीण भागातील शाळांना ऑनलाईनचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खेड्यापाड्यात नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. अनेक विद्यार्थ्यांकडे मोबाईलसुद्धा नाही. अशात शिक्षकांना युजर्स वाढवा, विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन करा, १०० टक्के रजिस्ट्रेशन झालेच पाहिजे, यासाठी अधिकाऱ्यांकडून प्रेशर टाकले जात आहे. एकीकडे शाळा सुरू होण्याची बोंबाबोंब आहे तर दुसरीकडे अधिकारी अनावश्यक कामात शिक्षकांना गुंतवीत आहेत.

मिलिंद वानखेडे, मुख्याध्यापक