शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
4
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
5
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
6
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
7
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
8
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
9
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
10
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
11
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
12
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
13
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
14
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
15
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
16
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
17
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
18
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
19
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
20
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं

मेडिकलध्ये किटअभावी चाचणी रखडली : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखणार कसा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 00:30 IST

नागपुरात रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या तुलनेत नमुन्यांची तपासणी फारच संथगतीने सुरू आहे. यातच बुधवारी किटअभावी मेडिकलची प्रयोगशाळा बंद पडली, तर मेयोने नागपुरातील केवळ सहाच नमुने तपासले.

ठळक मुद्देकेवळ सहाच नमुन्यांची तपासणी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : अकोला मेडिकलमध्ये चाचणीला सुरुवात झाल्याने नागपूरच्या तीन प्रयोगशाळेवरील नमुने तपासणीचा भार काहिसा कमी झाला. यामुळे नमुने तपसणीची संख्या वाढून प्रलंबित नमुन्यांची संख्या कमी होईल, अशी अपेक्षा होती, मात्र तूर्तास तरी तसे चित्र नाही. रोज ३०० वर तपासण्या होण्याची गरज असताना २०० ही तपासण्या होत नसल्याचे वास्तव आहे. नागपुरात रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या तुलनेत नमुन्यांची तपासणी फारच संथगतीने सुरू आहे. यातच बुधवारी किटअभावी मेडिकलची प्रयोगशाळा बंद पडली, तर मेयोने नागपुरातील केवळ सहाच नमुने तपासले. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणार कसा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या ५६ वर गेली आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा घट्ट होऊ लागला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत गुणात्मक वाढ होते. त्या तुलनेत मेयो, मेडिकल व एम्समध्ये सुरू असलेली नमुने तपासणीची संख्या समाधानकारक नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञाचे म्हणणे आहे. चार ते पाच तासाच्या एका ‘सायकल’मध्ये मेयो, मेडिकल व ‘एम्स’मध्ये प्रत्येकी ३०-४० नमुने तपासणे आवश्यक असताना तसे होताना दिसून येत नाही. यातही ‘एम्स’ने तपासलेले ९६ नमुन्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील ४२ तर अमरावती जिल्ह्यातील ५४ नमुने होते. यवतमाळमधील एक पॉझिटिव्ह नमुना वगळल्यास उर्वरित ९५ नमुने निगेटिव्ह आले. नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) प्रयोगशाळेत ३३ नमुने तपासण्यात आले. यात भंडारा जिल्ह्यातील १५, वर्धा जिल्ह्यातील एक, चंद्रपूर जिल्ह्यातील ११ तर नागपुरातील ६ नमुने होते. हे सर्वच नमुने निगेटिव्ह आले.कोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित १७९,दैनिक तपासणी नमुने १२९,दैनिक निगेटिव्ह नमुने १२८,नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ५६,नागपुरातील मृत्यू ०१,डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ११,डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण १०१८,कारन्टाईन कक्षात एकूण संशयित ५५३

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याGovernment Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय