शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलचे डॉक्टर कमिशनच्या मोहात!

By admin | Updated: September 11, 2016 02:09 IST

हल्ली कमिशन घेणे हे सामान्य समजले जाते. दुर्दैवाने वैद्यकीय क्षेत्रातही याचा समावेश झाला आहे.

गरीब रुग्णांना भुर्दंड : रक्तपिशवी, प्लेटलेट्स चाचण्यांच्या ‘क्रॉसचेक’ मधून मिळते २५ ते ५० टक्के कमिशनसुमेध वाघमारे नागपूरहल्ली कमिशन घेणे हे सामान्य समजले जाते. दुर्दैवाने वैद्यकीय क्षेत्रातही याचा समावेश झाला आहे. गरिबांचे रुग्णालय म्हणून ओळख असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) काही निवासी डॉक्टरही या कमिशनच्या मोहात अडकले आहेत. रुग्णालयातच तपासलेल्या नमुन्यांची बाहेरील पॅथालॉजीतून फेर पडताळणी (क्रॉसचेक) करणे, खासगी रक्तपेढीतून रक्त, प्लेटलेट्स बोलविणे, विशिष्ट पॅथालॉजीतून चाचणी करणे आदी प्रकार सर्रास सुरू आहेत. यात २५ ते ५० टक्के कमिशन डॉक्टर लाटत असल्याचा प्रकार सुरू आहे.वैद्यकीय शास्त्रात उपचाराची पहिली पायरी त्या रुग्णाच्या आजाराचे प्रथमत: निदान होणे. म्हणूनच मेडिकलमध्ये पॅथालॉजी, मायक्रोबॉयोलॉजी व बॉयोकेमेस्ट्री या स्वतंत्र लॅब आहेत. तीनही लॅबमध्ये लाखो रुपये किमतीची उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. नुकतेच बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांच्या सोईसाठी ‘सेंट्रल पॅथालॉजी लॅब’ (क्लिनिकल पॅथालॉजी ओपीडी) सुरू करण्यात आली आहे. शासनाचा यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च होत आहे. असे असतानाही कमिशनच्या हव्यासापोटी काही निवासी डॉक्टर रुग्णांच्या नातेवाईकांना भीती दाखवून विशिष्ट खासगी पॅथालॉजीमधून चाचण्यांची फेर पडताळणी करायला भाग पाडतात. या चाचण्या मेडिकलमध्ये होत असतानाही त्यावर अविश्वास दाखवून बाहेरून करून आणण्यास सांगतात.रक्तपेढीत रक्ताचा किंवा प्लेटलेट्सचा तुटवडा असेल तर मेयोच्या रक्तपेढीची मदत न घेता, स्वत: पैसे घेऊन खासगीमधून बोलवून देतात. खासगीमधून चाचण्यांचे क्रॉसचेक कधी थांबणार?मेडिकलच्या तिन्ही लॅबमध्ये सुधारणा करीत अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी चाचण्यांची गुणवत्ता राखणे (क्वॉलिटी कंट्रोल), त्याची फेर पडताळणी (क्रॉसचेक) करणे व २४ ही तास सहायक प्राध्यापकांच्या देखरेखेखाली नमुन्यांची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार कामही सुरू आहे. परंतु काही निवासी डॉक्टर रुग्णांच्या नातेवाईकांना मेडिकलच्या चाचण्यांच्या अहवालावर विश्वास नसल्याचे सांगून एका खासगी लॅबमधून चाचण्या ‘क्रॉसचेक’ करायला सांगतात. याचा मोठा भुर्दंड गरीब रुग्णांना बसत आहे. मेडिकलच्याच वॉर्ड ३५ मध्ये याचे ताजे उदाहरण समोर आले आहे. वॉर्डा-वॉर्डात फिरतात एजंटमेडिकलच्या अतिदक्षता विभागापासून ते अनेक वॉर्डा-वॉर्डात खासगी रक्तपेढीचे, लॅबचे एजंट फिरतात. अनेक निवासी डॉक्टरांचे या एजंटशी संबंध असल्याचे बोलले जाते. उल्लेखनीय म्हणजे, या संदर्भातील काही वरिष्ठ डॉक्टरांना याची माहिती आहे. परंतु जाणीवपूर्वक ते याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी, अशा डॉक्टरांचा कमिशनचा मोह पूर्ण होत आहे.