शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सौरऊर्जेने प्रकाशमान होणार मेडिकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:08 IST

सुमेध वाघमारे नागपूर : गरीब रुग्णांसाठी आशेचे किरण ठरलेल्या मेडिकललाही वीज बिलाचे चटके सहन करावे लागत आहे. विजेची मागणी ...

सुमेध वाघमारे

नागपूर : गरीब रुग्णांसाठी आशेचे किरण ठरलेल्या मेडिकललाही वीज बिलाचे चटके सहन करावे लागत आहे. विजेची मागणी सातत्याने वाढत असल्याने सौरऊर्जेचा पर्याय निवडला. परंतु, मागील तीन वर्षांपासून निधीअभावी हा प्रकल्प रखडला होता. अखेर पालकमंत्री नितीन राऊत यांनी यासाठी पुढाकार घेतल्याने आता तो पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. रविवारी प्रकल्पासाठी लागणारी यंत्रसामग्री उपलब्ध झाली. यामुळे संपूर्ण मेडिकल लवकरच सौरऊर्जेने प्रकाशमान होणार आहे.

आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत मोठे रुग्णालय म्हणून मेडिकलची ओळख आहे. रुग्णालयात केवळ विदर्भच नव्हे, तर मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा येथून रुग्ण येतात. दरवर्षी रुग्णसंख्येत वाढ होत आहे. रुग्णांना अद्ययावत उपचार मिळण्यासाठी नवे विभागही सुरू केले जात आहे. मागील पाच वर्षांत ट्रॉमा केअर सेंटर, अतिदक्षता विभागाची स्वतंत्र इमारत रुग्णसेवेत सुरू झाले. लवकरच मुलांचे वसतिगृह, कॅन्सर हॉस्पिटल, सिकलसेल सेंटर, स्पाईन सेंटर व इतरही नवीन विभागाचे बांधकाम होणार आहे. यामुळे या विभागांना मोठ्या प्रमाणात वीज लागणार आहे. सध्याच्या स्थितीत मेडिकलचे वीज बिलावर दरमहा जवळपास ८० लाख रुपये खर्च होत आहे. तो टाळण्यासाठी आणि खर्चातही बचत करण्याचा मेडिकलचा दुहेरी हेतू या सौरऊजेतून साध्य होणार आहे.

-तीन वर्षांची प्रतीक्षा संपली

मेडिकल प्रशासनाने २०१७मध्ये या प्रकल्पाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. त्यावेळी ‘महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण’कडून सौरऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी मेडिकलच्या इमारतीची पाहणी करण्यात आली होती. परंतु, पुढे निधीअभावी हा प्रकल्प थंडबस्त्यात पडला. डॉ. सुधीर गुप्ता यांच्याकडे अधिष्ठातापदाची जबाबदारी येताच त्यांनी या प्रकल्पासाठी पुढाकार घेतला. पालकमंत्री नितीन राऊत यांनी यात सहकार्य केल्याने जवळपास पाच कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली. यासाठी लागणारी यंत्रसामग्री रविवारी मेडिकलला उपलब्ध झाली.

-मेडिकलच्या इमारतीवर सौर पॅनेल

सौरऊर्जेतून वीज निर्मिती करण्यासाठी मेडिकलचा अपघात विभाग, वॉर्ड क्र. १३, १२, २८, ३२, ३३, पूर्व भागातील संपूर्ण विंग, मार्ड वसतिगृह, मुला-मुलींचे वसतिगृह, नर्सिंग होस्टेलच्यावर सौर पॅनल लावले जाणार आहे. साधारण १० हजार ३०० स्केअर मीटरवर लावण्यात येणाऱ्या या पॅनलमधून १६४८ किलो वॅट विजेची निर्मिती होणार आहे.

-सौरऊर्जेमुळे मेडिकलला मोठी मदत मिळेल

सौरऊर्जा हा स्वच्छ अपारंपरिक ऊर्जेचा स्रोत आहे. ऊर्जा बचत आणि विजेवर होणारा खर्च कमी करण्यासाठी सौरऊर्जा वरदान ठरत आहे. म्हणूनच सौरऊर्जा प्रकल्प लावण्याचा निर्णय घेण्यात आला. यात पालकमंत्री नितीन राऊत यांचे सहकार्य मिळाले. यामुळे रविवारी प्रकल्पाला लागणारी यंत्रसामग्री उपलब्ध झाली. लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित होईल.

-डॉ. सुधीर गुप्ता, अधिष्ठाता, मेडिकल