शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

माजी मंत्र्यांच्या निर्देशाला मेडिकलचा हरताळ

By admin | Updated: August 26, 2015 03:07 IST

मेडिकलमधील ‘एमआरआय’ ही अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणाची सेवा सरकारने मोफत ठेवलेली नाही.

एमआरआय शुल्काच्या सक्तीचा लावला फलकनागपूर : मेडिकलमधील ‘एमआरआय’ ही अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणाची सेवा सरकारने मोफत ठेवलेली नाही. यामुळे अत्यंत गरजू किंवा दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) रुग्ण या मशीनवरील निदानाला मुकत होते. यासंदर्भात तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी बीपीएल रुग्णांना मोफत सेवेचे निर्देश दिले होते. परंतु वैद्यकीय अधीक्षकांनी ‘एमआरआयचे शुल्क द्यावेच लागेल’ अशी सूचना भिंतीवर लिहून मंत्र्यांच्या निर्देशाला हरताळ फासला आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) दिवसाकाठी सुमारे १८०० च्यावर रुग्ण येतात. यातील सुमारे २०० हून अधिक रुग्ण गंभीर स्वरूपाचे असतात. यातील २५ टक्के रुग्णांना एमआरआय करणे गरजेचे असल्याचे डॉक्टर सांगतात. एमआरआयसाठी १८०० ते २५०० रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाते. त्यापूर्वी विशिष्ट पेशीची नेमकी अवस्था जाणून घेण्यासाठी ‘डाय’ द्यावा लागतो. मेडिकलमध्ये तेही उपलब्ध नाही. ते बाहेरून खरेदी करावे लागते. हा सर्व खर्च तीन ते चार हजाराच्या घरात जातो. विशेष म्हणजे, शासकीय रुग्णालयांमध्ये इतर सर्व शुल्कांमधून बीपीएल व ज्येष्ठ नागरिकांना वगळण्यात आले, मात्र एमआरआयचे शुल्क कायम ठेवले. यामुळे अनेक गरीब रुग्ण एमआरआय न काढताच उपचार करण्याची विनंती करतात. मेडिकलमध्ये दिवसाकाठी असे शेकडो रुग्ण येतात. यातील बऱ्याच रुग्णांना एमआरआय करण्याची गरज असूनदेखील दिवसभरात १० हून अधिक एमआरआय होत नाही. पैसे नसल्यामुळे मेडिकलमध्येही एमआरआय न काढणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. यासंदर्भातील वाढता रोष लक्षात घेऊन तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी ६ जानेवारी २०१३ च्या मेडिकल आढावा बैठकीत बीपीएल व अत्यंत गरजू रुग्णांना अधिष्ठात्यांच्या मदतीने एमआरआय मोफत काढावा, असे निर्देश दिले. मात्र एकाही गरजू रुग्णाचे नि:शुल्क एमआरआय झालेला नाही. आता तर वैद्यकीय अधीक्षक डॉ. जगदीश हेडाऊ यांनी आपल्या कक्षाच्या बाहेरील भिंतीवर एमआरआय कोणत्याही रुग्णाला अथवा रुग्णालयीन कर्मचाऱ्यांना मोफत नाही, याकरिता शुल्क द्यावे लागेल. याबद्दल चौकशी करू नये, अशी सूचनाच लावली आहे. (प्रतिनिधी)