शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मेयोच्या आग नियंत्रण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2015 02:56 IST

मेयो रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येतात. दुर्दैवाने येथे आगीची घटना घडलीच तर त्यापासून बचाव होईल अशी यंत्रणा असणे गरजेचे आहे.

अग्निशमन विभाग : प्रमाणपत्र न घेता नवीन इमारतींचे बांधकाम मेयो रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येतात. दुर्दैवाने येथे आगीची घटना घडलीच तर त्यापासून बचाव होईल अशी यंत्रणा असणे गरजेचे आहे. असे असूनही बहुमजली इमारत व मुलींच्या वसतिगृहासाठी बांधकाम विभागाने अग्निशमन विभागाकडून परिपूर्णता प्रमाणपत्र घेतलेले नाही. अग्निशमन विभागाच्या गंजीपेठ स्टेशनकडून या संदर्भात मेयो प्रशासनाला नोटीस बजावण्यात आली. परंतु मेयो प्रशासनाकडून यावर अहवाल पाठविल्याचे कळविण्यात आले. वास्तविक गंजीपेठ कार्यालयाकडून अद्याप अशा प्रकारचे प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. त्यामुळे आता अग्निशमन विभागाच्या मुख्यालयाकडून नोटीस बजावली जाणार आहे. त्यानंतरही परिपूर्णता प्रमाणपत्र न घेतल्यास रुग्णालयाचा पाणी व वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई होण्याची शक्यता आहे. मेयो रुग्णालयात सिटी स्कॅन, एक्स- रे मशीन यासह नवीन उपकरणे बसविण्यात आली आहेत. यासाठी उच्च दाबाच्या वीज वाहिनीची गरज असते. तसेच मेयो रुग्णालयाची इमारत व वायरिंग जुनी झाली आहे. ती बदलण्याची गरज आहे. अधिष्ठाता कार्यालय व एक्स-रे विभागात अनेकदा यापूर्वी आगीच्या घटना घडल्या आहे.(प्रतिनिधी)नोटीस बजावणारअग्निशमन विभागाच्या निकषानुसार बहुमजली इमारतीत आग नियंत्रणासाठी उपकरणे असणे आवश्यक आहे. यासाठी बांधकाम पूर्ण झाल्यानंतर संबंधित विभागाने निकषाची पूर्तता केल्याचा अहवाल अग्निशमन विभागाकडे सादर करणे आवश्यक असते. त्यानंतर विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र दिले जाते. परंतु ही प्रक्रिया पूर्ण केली नसल्याने नियमानुसार मेयो प्रशासनाला पाणी व वीज पुरवठा खंडित करण्याबाबत नोटीस बजावली जाणार आहे.- राजेन्द्र उचकेप्रमुख अग्निशमन अधिकारी, मनपा