शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

मेयो, मेडिकल व विद्यापीठ वाºयावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 00:18 IST

सरकारी रुग्णालयात डॉक्टरांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या मुद्यावरून गेल्यावर्षी निवासी डॉक्टरांंनी केलेल्या ....

ठळक मुद्देसुरक्षा जवान संपावर : पोलीस विभागाप्रमाणे सोई मिळण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरकारी रुग्णालयात डॉक्टरांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या मुद्यावरून गेल्यावर्षी निवासी डॉक्टरांंनी केलेल्या संपामुळे मेयो, मेडिकलसह राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये ‘महाराष्टÑ सुरक्षा दला’चे (एमएसएफ) जवान तैनात करण्यात आले होते. यात काही बंदूकधारीही होते. सुमारे सहा महिन्यांच्या सेवेनंतर सोमवारपासून अचानक हे जवान संपावर गेल्याने गोंधळ उडाला आहे. पोलीस विभागाप्रमाणे सोई मिळण्याच्या मागणीला घेऊन हा संप पुकारण्यात आल्याचे समजते.इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकडे (मेडिकल) स्वत:चे सुरक्षा रक्षक आहेत. परंतु त्यांची तोकडी संख्या व सुरक्षेचे प्रशिक्षण प्राप्त नसल्याने रुग्णालयात डॉक्टरांवरील हल्ले वाढल्यावर बोट ठेवत गेल्यावर्षी निवासी डॉक्टरांनी संप पुकारला होता.अखेर शासनाने रुग्णालयांना सुरक्षा पुरविण्याची जबाबदारी महाराष्टÑ सुरक्षा दलावर टाकली. सैनिकांच्या गणवेशासारखा पोषाख असलेले हे जवान हातात काठ्या घेऊन रुग्णालयात तैनात झाले. त्यांच्यामुळे काही प्रमाणात अनुचित घटनेला आळा बसला होता. परंतु त्यांना दिले जाणारे वेतन व इतर सोर्इंना घेऊन धूसफूस सुरू होती. अखेर सोमवारी सकाळपासून पोलीस विभागाप्रमाणे सोई मिळण्याच्या मागणीला घेऊन ‘महाराष्टÑ सुरक्षा दला’चे सर्व जवान संपावर गेले. यात मेयोमधील सुमारे ६६ तर मेडिकलमधील ७२ जवानांचा समावेश आहे. केवळ या दलाचे चार-पाच वरिष्ठ अधिकारी कामावर होते. अचानक सुरक्षा जवान संपावर गेल्याने मेयो, मेडिकल वाºयावर पडले आहे. निवासी डॉक्टरांसोबतच रुग्णांमध्ये असुरक्षितेचे वातावरण आहे.