शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मेयोचा भारही सुतिकागृहावर

By admin | Updated: May 1, 2017 01:20 IST

महापालिकेच्या पाचपावली येथील सुतिकागृहात आधीच डॉक्टर व परिचारिकांची वानवा आहे.

अ‍ॅन्टीरेबीज लसीकरणाचा अतिरिक्त बोजा : अपुऱ्या मनुष्यबळात कशी होणार सेवा गणेश हूड/आनंद डेकाटे नागपूर महापालिकेच्या पाचपावली येथील सुतिकागृहात आधीच डॉक्टर व परिचारिकांची वानवा आहे. उपलब्ध सुविधांमध्ये रुग्णांना चांगली सेवा देण्याचा डॉक्टर प्रयत्न करीत आहेत. आवश्यक सुविधा उपलब्ध करणे तर दूरच उलट येथील डॉक्टरांवर अतिरिक्त कामांचा बोजा टाकला जात असल्याचे चित्र आहे. अ‍ॅन्टीरेबीज लसीकरणाची येथे सुविधा उपलब्ध आहे. परंतु ही सुविधा उपलब्ध करतानाच मेयोतील रुग्णांनाही येथे लसीकरणासाठी पाठविले जाते. त्यामुळे या छोटेखानी रुग्णालयावर मेयोतील रुग्णांचाही अतिरिक्त भार वाढला आहे. नागपूर शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. परिणामी मोकाट कुत्र्यांनी चावा घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अशा रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी अ‍ॅन्टीरेबीज लस घेणे आवश्यक असते. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते, रेबीज हा अतिशय तीव्र स्वरूपाचा विषाणूजन्य प्राणघातक रोग आहे. रेबीज हा पशुजन्य संक्रमित आजार आहे. हा रोग प्राण्यांप्रमाणेच माणसांनाही कुत्रा चावल्यामुळे होतो. रोगाची लक्षणे तपासून तातडीने उपाययोजना करणे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे अ‍ॅन्टीरेबीज लस महापालिकेच्या इतर रुग्णालयाप्रमाणे पाचपावली सुतिकागृहातही उपलब्ध करण्यात आली आहे. अशीच व्यवस्था मेयो रुग्णालयात उपलब्ध असल्यास या रुग्णालयावरील भार कमी होईल. सुतिकागृहात मनुष्यबळाची कमतरता आहे. येथे एकूण २६ पदे मंजूर आहेत. त्यातील काही सेवानिवृत्त झाले आहेत. रुग्णालयात डॉक्टरांची सहा पदे मंजूर आहेत. परंतु केवळ तीन डॉक्टर कार्यरत आहेत. तेच संपूर्ण रुग्णालय सांभाळतात. ओपीडीतील रुग्ण पाहतात आणि तेच बाळंतपणही करतात. हे करीत असतानाच ते रेबीजचे औषधेही देत होतेच. परंतु आता मेयोतील रुग्णही येथे रेफर करणे सुरू झाले आहे. दररोज किमान २० ते २५ रुग्ण रेबीजचे असतात. वेळेवर वेतन नाही महापालिकेच्या बिकट आर्थिक स्थितीचा फटका पाचपावली सुतिकागृहातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनाही बसला आहे. कर्मचाऱ्यांना महिन्याच्या ५ तारखेपर्यंत वेतन मिळत होते. परंतु गेल्या काही महिन्यापासून वेळेवर वेतन मिळत नाही. महिना संपायला येतो तरी वेतनाची प्रतीक्षा करावी लागते. याचा कामकाजावर परिणाम होतो. नवीन बेडची गरज रुग्णालयातील बेड गेल्या अनेक वर्षांपासून बदलण्यात आलेले नाही. जुन्या पद्धतीचे बेड आरामदायी नसल्याने रुग्णांना उपलब्ध सेवेत समाधान मानावे लागते. येथे येणाऱ्या रुग्णांची संख्या विचारात घेता, नवीन बेडची गरज आहे. असामाजिक तत्त्वांचा वावर पाचपावली सुतिकागृहाच्या गेटवर सुरक्षा गार्डसाठी उभारण्यात आलेली खोली मोडकळीस आली आहे. कूलर व पंख्याची सुविधा नाही. उन्हाळ्याच्या दिवसात उकाड्यात गार्डला बसावे लागते. येथे एकच गार्ड तैनात असतो. या परिसरात असामाजिक तत्त्वांचा वावर असल्याने रु ग्णालयातील कर्मचारी व डॉक्टरांत असुरक्षिततेची भावना आहे. येथे सुरक्षा यंत्रणा सक्षम करण्याची गरज आहे. रंगरंगोटीचा अभाव महापालिका मुख्यालयातील पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या कक्षांची वर्ष-दोन वर्षांत रंगरंगोटी केली जाते. परंतु पाचपावली सुतिकागृहाच्या इमारतीची गेल्या अनेक वर्षांत रंगरंगोटी करण्यात आलेली नाही. परिसरात झुडपे वाढली आहेत. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. बसण्यासाठी व्यवस्थित बेंच नाही ओपीडीमध्ये रुग्णांची गर्दी असते. तपासणीसाठी येणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना प्रतीक्षा करावी लागते. अशावेळी त्यांना बसण्यासाठी आरामदायी बेंच उपलब्ध करण्याची गरज आहे.उपलब्ध असलेले बेंच मोकळीस आलेले आहेत. रुग्णालयाला नवीन फर्निचरची गरज आहे. कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया महिला व बाल रुग्णालय असल्याने येथे महिलांच्या कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. यासोबतच पुरुषांच्याही नसबंदीच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. यासाठी महाल येथील रुग्णालयातील पुरुष डॉक्टरची सेवा घेतली जाते. ते एका ठराविक दिवशी येथे येतात आणि शस्त्रक्रिया करतात. उद्यान विभागाचे दुर्लक्ष पाचपावली सुतिकागृहाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात खाली जागा वापराविना पडून आहे. येथे कचरा साचतो. उद्यान विभागाने खाली जागेत हिरवळ निर्माण केल्यास सुशोभिकरणामुळे वातावरण प्रसन्न राहील. परंतु महापालिकेच्या उद्यान विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे.