शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

मेयो : अखेर १० कोटींचे ‘एमआरआय’ दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 00:15 IST

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेयो) बहुप्रतीक्षित ‘एमआरआय’ यंत्र तब्बल आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर बुधवारी दाखल झाले. विशेष म्हणजे, सर्जिकल कॉम्प्लेक्सच्या तळमजल्यावर हे यंत्र स्थापन केले जात आहे. यासाठी प्रवेशद्वाराच्या भागातील कॉम्प्लेक्सची भिंत प्रशासनाला तोडावी लागली. ऑगस्ट महिन्यापर्यंत हे यंत्र रुग्णसेवेत सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ठळक मुद्देतब्बल आठ वर्षांची प्रतीक्षा पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेयो) बहुप्रतीक्षित ‘एमआरआय’ यंत्र तब्बल आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर बुधवारी दाखल झाले. विशेष म्हणजे, सर्जिकल कॉम्प्लेक्सच्या तळमजल्यावर हे यंत्र स्थापन केले जात आहे. यासाठी प्रवेशद्वाराच्या भागातील कॉम्प्लेक्सची भिंत प्रशासनाला तोडावी लागली. ऑगस्ट महिन्यापर्यंत हे यंत्र रुग्णसेवेत सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.मेयो प्रशासनाचे ‘एमआरआय’साठी २०११ पासून प्रयत्न सुरू होते. परंतु प्रस्ताव पाठवूनही प्रशाासकीय मंजुरीच मिळत नव्हती. नोव्हेंबर २०१६ रोजी ‘१.५ टेस्ला एमआरआय’साठी १० कोटी तर ‘१२८ स्लाईस सिटी स्कॅन’साठी ७ कोटी ५० लाखांना प्रशासकीय मंजुरी मिळाली. २०१६ च्या हिवाळी अधिवेशनात या यंत्राला घेऊन चर्चाही झाली. परंतु आर्थिक तरतूद झालीच नाही. ‘एमआरआय युनिट’ नसल्याने ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’ने (एमसीआय) मेयोतील ‘डिप्लोमा इन रेडिओ डायग्नोसिस’ची मान्यता काढून घेतली. हे यंत्र खरेदी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या प्रयत्नांमुळे एमआरआय, सिटीस्कॅनसह ११ प्रकारच्या उपकरण खरेदीसाठी शिर्डी साईबाबा संस्थेने ३५ कोटी २८ लाख रुपये दिले. मेयो प्रशासनाने हा निधी उपकरण खरेदीचे अधिकार असलेल्या ‘हापकिन्स’ कंपनीकडे वळता केला. याच दरम्यान ‘एमआरआय’ नसल्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला फटकारले. परिणामी, ३ जानेवारी २०१९ रोजी या निधीतून २५ कोटी इतक्या रकमेची यंत्रसामुग्री ‘टर्न-की’ तत्त्वावर खरेदी करण्यास प्रशासकीय मंजुरी मिळाली. एमआरआय युनिट स्थापन करण्यासाठी बांधकामाला वेळ लागणार होता. ‘एमआरआय’ यंत्र कुठे स्थापन करावे याबाबतही गोंधळ उडाला होता. यावर वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी यांनी तोडगा काढत सर्जिकल कॉम्प्लेक्समध्ये यंत्र स्थापन करण्याच्या सूचना दिल्या. दुसरीकडे खरेदी प्रक्रियेला वेग आला. अखेर १८ एप्रिल रोजी १३ कोटी १० लाख ८६८ रुपयांच्या एमआरआय यंत्राच्या खरेदीचे आदेश निघाले. जर्मनी येथील सीमेन्स कंपनीचे हे यंत्र २६ जून रोजी मेयोत दाखल झाले.यंत्रासाठी फोडली भिंतसर्जिकल कॉम्प्लेक्सच्या तळमजल्यावरील वॉर्ड क्रमांक ४३ येथे ‘एमआरआय युनिट’ विभाग उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. परंतु ‘एमआरआय’ यंत्र या वॉर्डात ठेवण्यासाठी बुधवारी कॉम्प्लेक्सची भिंत तोडावी लागली. क्रेनच्या मदतीने हे यंत्र स्थापन करण्यात आले.ऑगस्ट महिन्यापर्यंत रुग्णसेवेतमेयोमध्ये एमआरआय यंत्र दाखल झाले आहे. या यंत्रासाठी विशेष बांधकाम व विद्युत व्यवस्थेची गरज असते. यामुळे साधरण ऑगस्ट महिन्यात हे यंत्र रुग्णसेवेत सुरू होईल.डॉ. अजय केवलियाअधिष्ठाता, मेयो

 

 

टॅग्स :indira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)