शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

मटका अड्डा, दारू अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : झोन पाचचे डीसीपी निलोत्पल यांच्या पथकाने शुक्रवारी सकाळपासून विविध भागांत कारवाई करून मटका ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : झोन पाचचे डीसीपी निलोत्पल यांच्या पथकाने शुक्रवारी सकाळपासून विविध भागांत कारवाई करून मटका अड्डा, दारू अड्ड्यावर छापा घातला, तर बिना संगम येथे रेतीचोरी करणाऱ्यालाही पकडले.

जुनी कामठीच्या गुजरी चाैकात आरोपी सिराज अहमद ईरफान अहमद, तसेच देवराव चिंतामण गोमेकर या दोघांच्या मटका अड्ड्यावर छापा घालून, पोलिसांनी रोख रक्कम १२,४७० आणि मटक्याचे साहित्य जप्त केले. शुक्रवारी सायंकाळी ६च्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली.

तत्पूर्वी जरीपटक्यातील समतानगरात अवैध दारू विक्री करणाऱ्या आरोपी रजत उर्फ प्रांशू अनिल सहारे याच्या अड्ड्यावर कारवाई पोलिसांनी तेथून मोठ्या प्रमाणात देशी दारू जप्त केली. त्याचप्रमाणे, शुक्रवारी सकाळी ७.१०च्या सुमारास आरोपी शब्बीर युसूफ तेले (रा. बिना गाव, कामठी) याला त्याच्या वाहनासह ताब्यात घेतले. तो कामठी तालुक्यातील बिना संगम घाटावरून रेती चोरून नेताना आढळला. त्याच्याकडून रेती, तसेच वाहन असा एकूण ३ लाख, २ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस उपायुक्त निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विजय भिसे, तसेच नायक सूरज भारती, दिनेश यादव, हरिश इंगळे आणि चेतन जाधव, तसेच रवींद्र राऊत यांनी ही कामगिरी बजावली.

----