शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
2
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
3
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
4
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
5
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
6
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
7
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
8
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
9
जगन्नाथाच्या रथापुढे होते 'सोन्याच्या' झाडूने स्वच्छता; कोणी सुरू केली ही प्रथा? आता कोण करतं? वाचा!
10
Gold Silver Rates 27 June: सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत
11
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांची मदत घेतली जाणार नाही; भारताने प्रस्ताव फेटाळला
12
गोलंदाजांचा कहर...एकही फलंदाज टिकेना! फक्त एक फिफ्टी अन् २ दिवसांत पडल्या २४ विकेट्स!
13
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
14
१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार
15
Viral Video: कॅनडात ‘शंकर भगवान की जय’चा नारा; भारतीय विद्यार्थ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल
16
पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त
17
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
18
भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
19
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
20
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?

एमआयडीसीतील हत्याकांडाची मास्टरमाइंड गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या विजयाबाई पांडुरंगजी तिवलकर (वय ६५) यांच्या हत्येचा कट रचणारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या विजयाबाई पांडुरंगजी तिवलकर (वय ६५) यांच्या हत्येचा कट रचणारी आरोपी तनू काळे हिला तिच्या प्रियकरासह गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी पहाटे अमरावतीला ताब्यात घेतले. मृत विजयाबाई यांची तनू ही नात होय.

विजयाबाई एसआरपीएफच्या निवृत्त कर्मचारी होत्या. त्यांना एक मुलगा आणि दोन मुली असून तिघांचेही लग्न झाले आहे. हे तिघेही नागपुरातच वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या परिवारासह राहतात. वृद्ध विजयाबाई सप्तक नगरात एकट्या राहायच्या. त्यांच्या मुलीची मुलगी तनू स्वैर वागत होती. तिने आपल्या आईवडिलांचे घर सोडले होते. ती मित्रांसोबत राहायची. अधूनमधून आजी विजयाबाई यांच्याकडे यायची. आजी निवृत्त सरकारी कर्मचारी असल्याने तिच्याकडे १० ते १५ लाख रुपये आणि दागिने असल्याचा अंदाज तनूने बांधला होता. ती एकटीच असल्याने तिचा गेम करून रोकड तसेच दागिने लुटता येईल, आजूबाजूला सीसीटीव्ही वगैरे काही नसल्याने आपले पाप कुणाच्या लक्षात येणार नाही, असे तनूला वाटत होते. आपले अवाजवी खर्च भागविण्यासाठी आजीची हत्या करण्याचा कुविचार तिच्या मनात आला. त्यानुसार तिने प्रियकर फैजानच्या मदतीने कट रचला. त्यात फैजानचे साथीदार नीलेश प्रकाश पौनीकर, बाबा ऊर्फ कदिर खान, फरदीन खान आणि आरजू ऊर्फ मोहम्मद कमरे आलम यांना सहभागी करून घेतले. १० ते १५ लाख रुपये मिळणार म्हणून आरोपी त्यात सहभागी झाले आणि गुरुवारी मध्यरात्री त्यांनी विजयाबाईच्या गळ्यावर गुप्तीचे घाव घालून त्यांची हत्या केली. पोलिसांनी शनिवारी रात्री बाबा, नीलेश पौनिकर आणि फरदीन खान तसेच आरजूला पकडले. तर रोकड, दागिन्यांसह पळून गेलेल्या तनू आणि तिचा प्रियकर फैजान यांना अमरावतीला सोमवारी पहाटे ताब्यात घेतले.

---