शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मंगल कार्यालय, हाॅटेल मालकांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:13 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : नागरिकांचा बेजबाबदारपणा व काेराेना संक्रमण वाढत असतानाच काेराेना प्रतिबंधात्मक उपाययाेजनांचे सर्वांनी काटेकाेर पालन करण्यासाठी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : नागरिकांचा बेजबाबदारपणा व काेराेना संक्रमण वाढत असतानाच काेराेना प्रतिबंधात्मक उपाययाेजनांचे सर्वांनी काटेकाेर पालन करण्यासाठी महसूल व पाेलीस प्रशासनाने रामटेक शहरात दंडात्मक कारवाईची माेहीम सुरू केली आहे. या माेहिमेंतर्गत रामटेक शहरातील मंगल कार्यालय व हाॅटेल मालकांवर एकूण ९,५०० रुपयाचा दंड ठाेठावण्यात आला असून, वसूल केल्याची माहिती तहसीलदार बाळासाहेब मस्के व ठाणेदार प्रमाेद मकेश्वर यांनी संयुक्तरीत्या दिली.

महसूल, पाेलीस व स्थानिक नगर परिषद प्रशासनाने काेराेना साखळी ताेडण्यासाठी तसेच संक्रमण नियंत्रणात आणण्यासाठी पुन्हा जनजागृती करायला सुरुवात केली आहे. प्रतिबंधक उपाययाेजनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच दंडात्मक कारवाई करण्यासाठी रामटेक तालुक्यात चार स्वतंत्र पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. ही पथके रामटेक शहरासह तालुक्यातील संपूर्ण मंगल कार्यालये, हाॅटेल, रिसाेर्ट, बाजारपेठ तसेच इतर सार्वजनिक व व्यापारी ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांवर नियंत्रण ठेवणार असल्याचे तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी सांगितले.

प्रतिबंधात्मक उपाययाेजनांचे उल्लंघन करणाऱ्या मंगल कार्यालय मालकावर ७,५०० रुपये तर दाेन हाॅटेल मालकांवर प्रत्येकी एक हजार रुपयाप्रमाणे दाेन हजार रुपयाचा दंड ठाेठावला असून, दंडाच्या रकमेची लगेच वसुली करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. दुसरीकडे, लग्नसमारंभाला केवळ ५० व्यक्तींची परवानगी दिली आहे. त्यामुळे यापेक्षा अधिक व्यक्तींनी लग्नसमारंभात सहभागी हाेऊ नये. प्रत्येकाने घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे. गर्दीत जाणे अथवा गर्दी करणे टाळावे. हात वारंवार साबणाने धुवावे किंवा सॅनिटाईझ करावे, असे आवाहन तहसीलदार बाळासाहेब मस्के व ठाणेदार प्रमाेद मकेश्वर यांनी केले आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

....

दुकानदारांची काेराेना टेस्ट

काेराेनावर मात करण्यासाठी युद्धपातळीवर विविध उपाययाेजना करण्यात येणार असल्याचे तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी सांगितले. यात सर्व किराणा दुकानदार व हाॅटेल मालक, त्यांच्याकडील कर्मचारी व नाेकर, भाजीपाला व दूध विक्रेते, खासगी दवाखान्यांमधील कर्मचारी, औषधी दुकानदार व त्यांच्याकडील कर्मचारी किंवा नाेंद या सर्वांसह इतरांची काेराेना टेस्ट अनिवार्य करण्यात आली असून, ही प्रक्रिया सुरू झाली आहे.