शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

विवाहित महिलेवर मित्राने केला बलात्कार

By admin | Updated: October 27, 2015 03:33 IST

विवाहबाह्य संबंधाचे परिणाम कसे भयावह ठरू शकतात, त्याचा प्रत्यय सोनेगावमधील एका प्रकरणातून आला आहे.

नागपूर : विवाहबाह्य संबंधाचे परिणाम कसे भयावह ठरू शकतात, त्याचा प्रत्यय सोनेगावमधील एका प्रकरणातून आला आहे. तब्बल दीड वर्षांपासून बलात्कार आणि ब्लॅकमेलिंगचा त्रास सहन करणाऱ्या नराधमाविरुद्ध पीडित महिलेने तक्रार केल्यानंतर हे खळबळजनक प्रकरण उजेडात आले. सोनेगाव पोलिसांनी याप्रकरणी रुमिल शर्मा (वय २९, रा. वर्धमाननगर) या नराधमाला अटक केली. आरोपी शर्मा वर्धमाननगरात कथित जॉब प्लेसमेंटची दुकानदारी करतो. बड्या कंपनीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तो बेरोजगारांना आपल्या जाळ्यात ओढतो. सुस्वरूप तरुणींना तो बॉलिवूडमध्ये काम मिळवून देण्याचेही स्वप्न दाखवतो. अशाच प्रकारच्या स्वप्नाला बळी पडलेली पीडित महिला (वय २९) सोनेगावमधील रहिवासी आहे. गेल्या वर्षी ती शर्माच्या संपर्कात आली. चांगला ‘जॉब’ मिळवून देण्याचे शर्माने आश्वासन दिल्यामुळे त्यांच्यात मैत्री झाली. महिलेचा पती एका मोठ्या कंपनीत नागपूरबाहेर नोकरी करतो. त्यामुळे ती आणि शर्मा दोघेही निरंतर आॅनलाईन संपर्कात राहायचे. नंतर आरोपी शर्माचे तिच्याकडे जाणे-येणेही सुरू झाले. १५ जुलै २०१४ रोजी त्याने तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. नंतर त्यांच्यात वेळोवेळी शरीरसंबंध प्रस्थापित होऊ लागले. महिलेने आपल्या मर्यादा ओलांडल्याने आरोपी शर्माने एका दिवशी शरीरसंबंधाची व्हिडीओ क्लिप तयार केली. मोबाईलमध्ये फोटोही काढले. त्यानंतर त्याच्या मनात येईल तेव्हा तो तिच्याकडे शरीरसंबंधाची मागणी करू लागला. विवाहित असल्यामुळे ती त्याच्याकडे आपल्या अडचणी सांगायची. मात्र, तिने नकार दिला किंवा कारण सांगितल्यास तो तिला व्हिडीओ क्लिप आणि फोटो इंटरनेटवर टाकण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार करू लागला. पती असतानाच...काही दिवसांपूर्वी पीडित महिलेचा पती नागपुरात परत आला. अशात २४ आॅक्टोबरला दुपारी १२.३० वाजता आरोपी शर्मा तिच्याकडे आला. पती कोणत्याही वेळेला घरी येऊ शकतो, असे सांगूनही त्याने तिच्यावर पाशवी बलात्कार केला. अर्ध्या तासानंतर तिला धमकी देऊन तो निघून गेला. काही वेळेनंतर पती घरी परतला. तिची अवस्था पाहून त्याला शंका आली. तिचे मंगळसूत्रही दिसत नसल्याने त्याने खोदून खोदून विचारले असता महिलेने या प्रकरणाची माहिती दिली. आरोपी ब्लॅकमेल करीत असल्यामुळे मंगळसूत्र गहाण ठेवून त्याला ५० हजार दिल्याचेही सांगितले.