शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

बाजार सुसाट; गर्दीत ना मास्क ना सोशल डिस्टन्सिंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:06 IST

गर्दीला आवरणार कोण ? : संक्रमण कमी झाले तरी धोका अजूनही कायम लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोविड ...

गर्दीला आवरणार कोण ? : संक्रमण कमी झाले तरी धोका अजूनही कायम

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोविड संक्रमण नियंत्रणात आल्याने नागपूर शहरातील दुकाने सुरू ठेवण्याचा कालावधी रात्री ८ वाजेपर्यंत वाढविण्यात आला आहे. सोबतच निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत; परंतु आठवडी बाजारातील प्रचंड गर्दीमुळे चिंता वाढली आहे. रविवारी शहरातील प्रमुख बाजार असलेल्या सीताबर्डी, महाल, इतवारी, खामला, जरीपटका, सक्करदरा आदी भागांतील गर्दी बघता नागरिकांना कोरोनाची भीती उरलेली नाही. आठवडी बाजारातही ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग असे चित्र बुधवार बाजारात दिसून आले. नागरिकांसोबतच विक्रेतेही बेफिकीर असून त्यांना संक्रमणापेक्षा धंदा महत्त्वाचा वाटत आहे. परंतु ही परिस्थिती धोकादायक आहे. कोरोनाचे संक्रमण कमी झालेले असले तरी अजूनही धोका टळलेला नाही.

....

रविवारमुळे बाजारात गर्दी

रविवारी महाल, सीताबर्डी, इतवारी बाजारात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सोशल डिस्टन्सिंग तर कुठेही पाळले जात नाही. गर्दीच्या ठिकाणी ते शक्यही नाही. अनेक जण मास्क न लावता बाजारात खरेदी करतात. मास्क लावली तरी तो तोंडाच्या खाली ठेवतात. मनपाच्या पथकाने कारवाई करू नये यासाठी अनेक जण मास्क वापरत असल्याचे दिसून आले.

....

सोशल डिस्टन्सिंग नाहीच

सक्करदरा येथे बुधवारसोबत रविवारीही आठवडी बाजार भरतो. सकाळपासून बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. भाजी विक्रेत्यांची दुकाने एकमेकांना लागून असल्याने कुठल्याही स्वरूपाचे सोशल डिस्टन्सिंग बघायला मिळाले नाही.

...

अनेकांच्या तोंडाला मास्क नाही

बाजारात अनेक जण तोंडाला मास्क न लावताच खरेदी करीत असल्याचे दिसून आले. बहुसंख्य विक्रेतेही मास्कचा वापर न करताचा विक्री करतात. महाल व सीताबर्डी बाजारात विक्रेते जोरजोराने ओरडत असतात. मास्क घालून ओरडणे शक्य नसल्याने ते मास्कचा वापर करत नाही. असेच चित्र भाजी बाजारातही दिसून आले.

...

कोरोनाची भीती नाही

कोरोना संक्रमण कमी झाले असले तरी धोका अजूनही कायम आहे असे असले तरी लोकांना कोरोनाची भीती उरलेली दिसत नाही. त्यामुळे बाजारात कोविड नियमांचे पालन होताना दिसत नाही. मनपाच्या उपद्रव शोध पथकामार्फत कारवाई केली जाते. परंतु पथकातील जवानांची संख्या व शहराचा आवाका बघता सर्व भागात एकाच वेळी कारवाई करणे शक्य नाही.

.........

शहारात शंभराहून अधिक बाजार

नागपूर शहरात शंभराहून अधिक आठवडी बाजार आहेत. यात दहा अधिकृत असून यात नेताजी मार्केट, सुपर मार्केट मागे, गोकूळपेठ मार्केट, मंगळवारी सदर,सोमवारी पेठ, बुधवार मार्केट महाल, कमाल चौक, महात्मा फुले मार्केट, लकडगंज व इतवारा बाजार आदीचा समावेश आहे. तर अनधिकृत बाजार ९०च्या आसपास आहेत. यातील प्रमुख बाजार असे, जयताळा,पारडी,सोनेगाव, हिवरीनगर, सीतानगर, हुडको कॉलनी, फ्रेन्डस् कॉलनी,पिवळी नदी,उदयनगर रिंग रोड, टिपू सुलतान चौक, ढगे बंगला,कबीर नगर, मानेवाडा, कपिल नगर,शताब्दी चौक,यशोधरा नगर,रमना मारोती,पेन्शन नगर, हसन बाग, कावरापेठ, विनोबा भावे नगर,शांतीनगर,वाठोडा आदीचा समावेश आहे.

....

मनपाचे उपद्रव शोध पथक पूर्ण क्षमतेने काम करत आहे. परंतु कार्यवाहीला मर्यादा आहे. नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज आहे. संक्रमण कमी झालेले असले तरी धोका अजूनही कायम आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. यातच सर्वांचे हित आहे.

- वीरसेन तांबे, उपद्रव शोध पथक प्रमुख, मनपा