शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
4
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
5
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
6
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
7
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
8
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
9
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
10
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
11
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
12
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
13
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
14
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
15
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
16
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
17
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
18
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
19
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
20
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले

बाजार संपला; उरला घोटाळा

By admin | Updated: December 9, 2014 00:52 IST

उत्पन्नाचे स्रोत नसल्यामुळेच उत्पन्न वाढवायचे कसे,अशा कचाट्यात सापडलेल्या कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीने केलेल्या घोटाळ्याचा १२ पानी चौकशी अहवाल कामठी येथील सहाय्यक निबंधक चैतन्य नासरे

कामठी कृषी उत्पन्न बाजार समिती : उपनिबंधकाच्या चौकशी अहवालातील सत्ययशवंत गजभिये - नागपूरउत्पन्नाचे स्रोत नसल्यामुळेच उत्पन्न वाढवायचे कसे,अशा कचाट्यात सापडलेल्या कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीने केलेल्या घोटाळ्याचा १२ पानी चौकशी अहवाल कामठी येथील सहाय्यक निबंधक चैतन्य नासरे यांनी जिल्हा उपनिबंधकांना सादर केला. त्यात पाच मुद्यांच्या आधारावर चौकशी अहवालाचा निष्कर्ष मांडण्यात आला. एकूणच ‘बाजार संपला अन् उरला फक्त घोटाळा’असे हाल आहेत. बाजार समितीच्या अनियमिततेवर बोट ठेवण्यात आल्याने संचालक हादरुन गेले आहेत.जीप गाडी व डिझेलचा दुरुपयोगजिल्हा उपनिबंधकांच्या चौकशी अहवालात जीप गाडीच्या लॉग बुकमध्ये गाडीच्या मीटर रिडींगची नोंदणी घेतली नसल्याचे उघडकीस आले. यावेळी ही जीपगाडी बहुतांशवेळी नागपूर येथे प्रवास करीत असल्याचे आढळून आले. ही जीपगाडी समितीच्या कार्यालयात न ठेवता समितीच्या कार्यक्षेत्राबाहेर नागपूर येथे ठेवण्यात येते. त्यामुळे या मुद्यांवर सत्यता पटत असून या व्यवहाराकरिता सभापती व वाहनचालक दोघेही जबाबदार असल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. या जीप गाडीवर इंधनाचा खर्च किती झाला याची शहानिशा करण्यात आली नाही. यासाठी वाहनचालक व वाहनांचा वापर करणारे जबाबदार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.जाहिरातीचा खर्च२०१२ व १३ मध्ये अर्थसंकल्पात ४० हजार रुपयांची तरतूद असताना मात्र बाजार समितीने १ लाख ३० हजार रुपये खर्च केला आहे. बाजार समितीने महाराष्ट्र कृषी मंडळ पुणे यांनी मंजूर केलेल्या मूळ अर्थसंकल्पाचे पालन केले नाही. जाहिरातीवर महसुली उत्पन्नापेक्षा २१ टक्के जास्तीचा खर्च करण्यात आला आहे व या खर्चासाठी महाराष्ट्र कृषी मंडळ पुणे यांची परवानगी घेतली नाही. हा ठराव बाजार समितीच्या सभेत मंजूर केल्यामुळे यावर झालेल्या अतिरिक्त खर्चाला संचालक मंडळ जबाबदार असल्याचे या लेखी सांगण्यात आले आहे.कामांना कलम १२(१) ची मंजुरी आवश्यकनियमानुसार बाजार समितीच्या संचालक मंडळाला विविध कामाकरिता कलम १२(१) ची मंजुरी घ्यावी लागते. परंतु संचालकांच्या एकमताने होणाऱ्या आग्रहाला ठरावसहित मंजुरी अधिकार दिल्याने सभापतींनी कामे स्वत:च्या स्तरावर पूर्ण केले व पूर्ण केलेल्या कामाचे बिल जुन्याच ठेकेदाराला मंजूर केले. यावेळी या कामांना कलम १२(१) ची मंजुरी नाही. त्यामुळे कृषी उत्पन्न खरेदी नियमन अधिनियम १९६३ चे उल्लंघन झाल्याचे सिद्ध होते. पण या कामांना संचालक मंडळाने मासिक सभांमध्ये विविध ठरावांद्वारे मंजुरी दिली असल्याने केलेल्या नियमबाह्य खर्चासाठी कामठी कृषी बाजार समिती व संचालक मंडळ जबाबदार असल्याचे सिद्ध करण्यात आले आहे.बांधकामातही घोटाळाकामठी बाजार समितीने २०१२ ते १४ या आर्थिक वर्षात कोणत्याही बांधकामाची परवानगी न घेता नियमबाह्य बांधकाम केले. महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियम १९६३ मधील कलम १२/१ नुसार ही परवानगी पणन संचालनाकडून घ्यावी लागते. ती परवानगी या बाजार समितीकडून घेण्यात आली नाही. तसेच बांधकामाचे मूल्यांकनही केले नाही. मात्र या बांधकामाचे संपूर्ण पैसे ठेकेदारांना देण्यात आले. त्याची बिले देण्यात आली. या व्यतिरिक्त जुलै २०१२ ते मे १३ पर्यंत जो खर्च बाजार समितीने बांधकाम व साहित्य खरेदीवर केला आहे, त्याला कलम १२(१) ची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे हा खर्च नियमबाह्य आहे व तो संपूर्ण खर्च सभापती व संचालक मंडळाकडून वसूल करण्यात यावा, असे जिल्हा उपनिबंधकांनी अहवालात स्पष्ट केले आहे.संचालक मंडळ जबाबदारभेटी समारंभाच्या अतिरिक्त खर्चाला संचालक मंडळास जबाबदार धरले आहे व तो पैसा त्यांच्याकडून वसूल करण्यात यावा असेही म्हटले आहे. महसुली उत्पन्नापेक्षा २६ टक्के जास्तीचा खर्च केला आह ेअसे चौकशी अहवालात नमूद आहे.