शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

मनपाचा दावा, म्हणे रोज खड्डे दुरुस्ती होते : सहा महिन्यांत बुजविले तीन हजारांहून अधिक खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 21:27 IST

हरात रस्त्यांच्या सिमेंटीकरणाचे काम सुरू असले तरी, अनेक डांबरी रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनचालक बेजार झाले आहेत.

ठळक मुद्देशहरात रस्त्यांच्या सिमेंटीकरणाचे काम सुरू असले तरी, अनेक डांबरी रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनचालक बेजार झाले आहेत. शहरात रोज खड्डे पडतात व रोज खड्ड्यांची दुरुस्ती होते, असे उत्तर  मनपातर्फे माहितीच्या अधिकारांतर्गत देण्यात आले आहे

नागपूर, दि.26 - शहरात रस्त्यांच्या सिमेंटीकरणाचे काम सुरू असले तरी, अनेक डांबरी रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनचालक बेजार झाले आहेत. मात्र वातानुकूलित कार्यालयांमध्ये बसलेल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या नजरेला बहुतेक हे खड्डे दिसतच नाहीत. म्हणूनच की काय शहरात रोज खड्डे पडतात व रोज खड्ड्यांची दुरुस्ती होते, असे उत्तर नागपूर मनपातर्फे माहितीच्या अधिकारांतर्गत देण्यात आले आहे. जर रोज खड्ड्यांची दुरुस्ती होते, तर शहरातील हजारो खड्डे काय एका रात्रीत निर्माण झाले की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत मनपाकडे विचारणा केली होती. शहरातील खड्ड्यांची संख्या, बुजविण्यात आलेले खड्डे, खड्डे बुजविण्यासाठी प्राप्त व खर्च झालेली रक्कम इत्यादी प्रश्न उपस्थित केले होते. मनपाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, १ एप्रिल २०१४ ते १७ जून २०१७ या कालावधीत शहरात ४८ हजार २१७ खड्डे बुजविण्यात आले. यात हॉटमिक्स प्लॅन्टद्वारे बुजविण्यात आलेल्या ३६ हजार ७८ तर जेटपॅचरद्वारे बुजविण्यात आलेल्या १२ हजार १३९ खड्ड्यांचा समावेश आहे. शहरात रोज खड्डे पडतात व रोज दुरुस्ती होते. त्यामुळे खड्ड्यांची एकूण संख्येत माहिती देणे अशक्य असल्याचे मनपाच्या उत्तरात नमूद आहे. १ जानेवारी ते १७ जून २०१७ या कालावधीत शहरामध्ये ३,२८१ खड्डे बुजविण्यात आल्याचा दावा मनपाने केला आहे.

नागरिकांच्या तक्रारी स्वीकारत नाही का?मनपाकडे खड्ड्यांसंदर्भात नेमक्या किती तक्रारी आल्या, या प्रश्नाच्या उत्तरात आश्चर्यकारक माहिती देण्यात आली आहे. नगरसेवक, पदाधिकारी तसेच झोनचे सहआयुक्त यांच्या पत्र किंवा भ्रमणध्वनीद्वारे तक्रारी प्राप्त होते. त्यानुसार खड्ड्यांची संख्या ठरविण्यात येते, असे मनपाने सांगितले आहे. मात्र नागरिकांचा कुठेही उल्लेख नाही. नागरिकांच्या तक्रारी मनपा थेट स्वीकारत नाही का, असा प्रश्न यातून उपस्थित होत आहे.