शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

मनीष श्रीवासच्या हत्याकांडाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - कुख्यात गुन्हेगार मनीष श्रीवास याच्या हत्याकांडाशी संबंधित महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले असून कधीकाळी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - कुख्यात गुन्हेगार मनीष श्रीवास याच्या हत्याकांडाशी संबंधित महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले असून कधीकाळी नागपूरच्या गुन्हेगारी जगतात प्रचंड दबदबा असलेल्या गँगस्टरचा भाऊ आणि माजी नगरसेवकासह काही जणांना पोलिसांनी शुक्रवारी चाैकशीसाठी ताब्यात घेतले. त्यामुळे लवकरच या हत्याकांडाचा खुलासा होण्याचे संकेत मिळाले आहेत.

अत्यंत क्रूर गुन्हेगार म्हणून नागपूरच नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यातही कुपरिचित असलेल्या मनीषची १० वर्षांपूर्वी गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड दहशत होती. तो कुणाचाही गेम करण्यासाठी तयार राहायचा आणि कुणाचीही सुपारी घ्यायचा. मनीष श्रीवास २०१२ मध्ये अचानक गायब झाला. आर्थिक व्यवहारातून त्याने एका गुन्हेगाराची सुपारी घेतल्यामुळे त्याला ओल्या पार्टीत बोलवून त्याची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आल्याची कुजबुज काही महिन्यानंतर गुन्हेगारी वर्तुळात चर्चेला आली. मनीषला तंदूरच्या भट्टीत जाळून त्याची राख नदीत सोडल्याचीही नंतर उघड चर्चा सुरू झाली. नागपूर शहर आणि जिल्ह्यातील लहानमोठ्या सर्वच गुन्हेगारांना हे माहीत असले तरी सर्वांनीच तोंडावर झापड बांधून घेतले. विशेष म्हणजे, मनीषच्या पत्नीने २०१६ मध्ये या संबंधाने आवाज उचलला. परंतु तो आवाज संबंधित गुन्हेगारांकडून दाबण्यात आला. पोलिसांनीही फारसे गांभीर्याने लक्ष न दिल्याने हे रहस्यमय हत्याकांड पोलिसांच्या फाईलमध्ये दबले. मात्र, दोन महिन्यांपूर्वी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शहरातील अनडिटेक्ट मर्डरचा उलगडा करण्यासाठी खास पथकांना कामी लावले. त्यांनी रात्रीचा दिवस करून लकडगंज, कन्हान, कामठीतून मनीषच्या हत्याकांडाचे धागेदोरे उकरुन काढले. चार दिवसांपूर्वी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी मनीषच्या हत्याकांडाचा उलगडा होऊ शकतोे, असा आत्मविश्वास पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. या पार्श्वभूमीवर, मंगळवार ते गुरुवार नागपूरसह, कामठी, कन्हानच्या गुंडांची पोलिसांनी झाडाझडती घेतली. अनेकांना बाजीरावची मुक्तहस्ते भेट दिल्याने त्यांनी मनीषच्या हत्याकांडाचे फिल्मीस्टाईल कथानक पोलिसांसमोर उघड केल्याचे समजते. याच माहितीच्या आधारे शुक्रवारी एका माजी नगरसेवकासह नागपुरातील सर्वात जुना (दिवंगत) गँगस्टरच्या भावाला आणि आणखी काही गुन्हेगारांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडूनही या हत्याकांडावर बराचसा प्रकाश पडल्याने रहस्यमय ठरलेल्या मनीष श्रीवास हत्याकांडाचा उलगडा होण्याची शक्यता वाढली आहे.

---

कामठी- कन्हान अस्वस्थ

मनीषच्या हत्याकांडात महत्त्वाची भूमिका वठविणारे अनेक गुन्हेगार आता निर्धास्त झाले होते. मात्र, पोलीस आयुक्तांकडून या आठवड्यात अनेकांची पेशी झाल्याने कधीही पोलीस आपली मानगुट पकडू शकतात, अशी त्यांना भीती वाटत आहे. त्यामुळे लकडगंजसह कामठी कन्हानमध्येही तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे.

---

सीपी म्हणतात... ‘वेट ॲन्ड वॉच’

या संबंधाने पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हसत हसत महत्त्वाची माहिती मिळाल्याचे म्हटले. लवकरच या हत्याकांडाचा खुलासा होऊ शकतो, असे संकेत देत ‘वेट ॲन्ड वॉच’ची सूचक प्रतिक्रिया दिली.

---