शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

होळीपूर्वी मनपाला धक्का

By admin | Updated: March 23, 2016 03:00 IST

राज्य सरकारने एलबीटी रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या मोबदल्यात राज्यातील महापालिक ांना अनुदान देण्याचा

नागपूर : राज्य सरकारने एलबीटी रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या मोबदल्यात राज्यातील महापालिक ांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार नागपूर महापालिके ला दर महिन्याला ४९.२९ कोटींचे अनुदान मिळत होते. परंतु यात ३.२९ कोटींनी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा अध्यादेश काढून राज्य सरकारने होळीपूर्वी महापालिकेला जबर धक्का दिला आहे. महापालिका प्रशासनाला या संदर्भात अद्याप निर्देश प्राप्त झालेले नाही. परंतु होळीपूर्वी हा निर्णय घेतल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. आॅगस्ट २०१५ मध्ये सरकारने एलबीटी रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. या मोबदल्यात महापालिकांना अनुदान देण्याची घोषणा केली होती. महापालिकेला दर महिन्याला ३०.९९ कोटींचे अनुदान मिळत होते. परंतु मिळणारे अनुदान कमी असल्याने महापालिकेच्या आर्थिक अडचणी वाढल्या होत्या. पदाधिकारी व प्रशासनाने शासनाला माहिती दिली होती. निधी वाढवण्याची वेळोवेळी मागणी केली होती. त्यानुसार राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने आढावा घेऊ न अनुदानासंदर्भात सुधारित निर्णय घेतला होता. यात अनेक महापालिक ांच्या अनुदानात कपात करण्यात आली होती. परंतु नागपूर महापालिकेला ४९.२९ कोटींचे अनुदान मिळत होते. यामुळे मोठा दिलासा मिळाला होता. विकास कामांसाठी निधी उपलब्ध झाला होता. (प्रतिनिधी)कर्मचाऱ्यांना वेतनाची प्रतीक्षाप्रत्येक महिन्याच्या १० तारखेला राज्य सरकारकडून महापालिकेच्या खात्यात एलबीटी अनुदान जमा केले जाते. परंतु यावेळी २२ तारीख झाली तरी अद्याप ही रक्कम जमा झालेली नाही. २४ मार्चला होळी आहे. त्यानंतर २५ मार्चला गुडफ्रायडे, नंतर चौथा शनिवार व रविवार असल्याने चार दिवस बँका बंद राहणार आहे. महापालिकेच्या काही विभागातील कर्मचाऱ्यांचे वेतन त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. परंतु बहुसंख्य विभागातील कर्मचाऱ्यांना अद्याप फेब्रुवारी महिन्याचे वेतन मिळालेले नाही. त्यामुळे होळी कशी साजरी करावी, असा प्रश्न त्यांना पडला आहे.