शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीसाठी मनपाला ‘वन ग्लोब अवॉर्ड’

By admin | Updated: February 14, 2017 02:12 IST

देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्ती, संस्था, राज्य आणि प्रकल्पांना वन ग्लोब फोरमतर्फे ‘वन ग्लोब अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात येते.

यशस्वी पुढाकार : अपर आयुक्त सोनवणे यांनी स्वीकारला पुरस्कारनागपूर : देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्ती, संस्था, राज्य आणि प्रकल्पांना वन ग्लोब फोरमतर्फे ‘वन ग्लोब अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षी नागपूर महापालिकेला स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी यशस्वी पुढाकार घेतल्याने हा पुरस्कार मिळाला आहे. नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री पी.पी. चौधरी यांच्याहस्ते अपर आयुक्त व स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.नागपूर स्मार्ट अ‍ॅण्ड सेफ सिटी प्रकल्पांतर्गत नागपूर शहरात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांमुळे या पुरस्कारासाठी महापालिकेची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. यासोबतच महाराष्ट्र राज्याच्या माहिती व तंत्रज्ञान विभागालाही पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ‘स्मार्ट’ राज्य म्हणून सक्षम करण्यात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. राज्याच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या प्रधान सचिवांच्या वतीने सोनवणे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.सोनवणे यांनी सदर पुरस्कार सोमवारी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी अप्पर आयुक्त रवींद्र कुंभारे, उपायुक्त रवींद्र देवतळे उपस्थित होते. या पुरस्कारामुळे अधिकाऱ्यांचा उत्साह वाढला असून स्मार्ट सिटीचे कार्य अधिक वेगाने होईल, असा विश्वास हर्डीकर यांनी यावेळी व्यक्त केला.(प्रतिनिधी)