शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

मनपाकडे हॉकर्सचे ४९ लाख रुपये जमा

By admin | Updated: February 25, 2016 03:15 IST

शहरातील परवानाधारक हॉकर्सनी व्यवसाय करण्यासाठी मनपाकडे प्रत्येकी ११०० रुपये जमा केले आहेत. असे सुमारे ४९ लाख रुपये मनपाकडे जमा आहेत, ...

हायकोर्टात माहिती : हॉकर्स असोसिएशनचे प्रतिज्ञापत्रनागपूर : शहरातील परवानाधारक हॉकर्सनी व्यवसाय करण्यासाठी मनपाकडे प्रत्येकी ११०० रुपये जमा केले आहेत. असे सुमारे ४९ लाख रुपये मनपाकडे जमा आहेत, अशी माहिती सीताबर्डी हॉकर्स वेल्फेअर असोसिएशनने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली.मनपाने हॉकर्सचे अतिक्रमण हटविले नाही म्हणून सीताबर्डी मर्चन्टस् असोसिएशनचे सचिव व्ही. एम. अग्रवाल यांनी उच्च न्यायालयात अवमानना याचिका दाखल केली आहे. याप्रकरणात हॉकर्स असोसिएशनने प्रतिज्ञापत्र सादर करून वरील माहिती दिली. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महानगरपालिकेने हॉकर्सच्या समस्या सोडविण्यासाठी समिती स्थापन केली आहे. समितीच्या काही सभा झाल्या आहेत. परंतु, त्यात कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १० जून २००२ रोजी दिलेल्या आदेशानुसार शहरात हॉकर्स झोन तयार करणे आवश्यक आहे. या आदेशाचीही अंमलबजावणी करण्यात आली नाही. याउलट मनपा हॉकर्सवर गैरकायदेशीररीत्या कारवाई करीत आहे. शहरात सध्या नेताजी मार्केट, पटवर्धन मैदान, महाराजबाग रोड, पीकेव्ही मैदान ते झाशी राणी चौक येथे जागा उपलब्ध आहेत. ओटे, पार्किंग, पिण्याचे पाणी व विजेची सुविधा उपलब्ध करून दिल्यास परवानाधारक हॉकर्स येथे व्यवसाय करण्यास तयार आहेत. सर्व हॉकर्स कायद्यानुसार व्यवसाय करीत आहेत. पर्यायी जागा उपलब्ध होईपर्यंत हॉकर्सना मुख्य रोडवरच व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात यावी. केवळ परवाना नसलेल्या हॉकर्सवर कारवाई करण्यात यावी, असे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. यासंदर्भात संघटनेने २१ जानेवारी रोजी मनपाच्या बाजार विभागाचे सहायक आयुक्तांना पत्र लिहिले, असेही न्यायालयाला सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)