लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आरोग्य विभागाच्या अखत्यारित असलेल्या नर्सिंग प्रशिक्षणार्थी मुर्तीच्या वसतिगृहात नर्सिंग कौन्सिलच्या ऑफ इंडियाच्या नियमांना धाब्यावर बसवून पुरुष वॉर्डन नियुक्त असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
१६ ते २१ वयोगटातील मुली राहतात अशा वसतिगृहात केवळ महिला वॉर्डन असणे हे नर्सिंग कौन्सिलच्या ऑफ इंडियाच्या नियमांनुसार बंधनकारक आहे. परंतु, आरोग्य विभागाने ही सक्ती सर्रास मोडीत काढली असून, राज्यातील मुर्लीच्या वसतिगृहांमध्ये ११ पुरुष वॉर्डन कार्यरत असल्याचे समोर आले आहे. या वसतिगृहांमध्ये नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन व तरुण मुलींना शैक्षणिक दडपणाबरोबरच वैयक्तिक, शारीरिक आणि भावनिक समस्या भेडसावत असतात. अशावेळी महिला वॉर्डनकडून केवळ देखरेखीचेच नाही तर मार्गदर्शन, मानसिक आधार, आईसारखी साथ यांची अपेक्षा असते. पुरुष वॉर्डन असल्याने मुली स्वतःच्या अडचणी सांगण्यासही कचरतात, परिणामी त्यांच्या सुरक्षेवा आणि मानसिक आरोग्याचा प्रश्न गंभीर बनतो.
येथे आहेत पुरुष वॉर्डनराज्यातील जिल्हा रुग्णालय वर्धा, जिल्हा रुग्णालय भंडारा, बुलढाणा, ठाणे, स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ, नागपूर येथे पुरुष वॉर्डन आहेत. शिवाय जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथे प्रत्येकी ३ पुरुष वॉर्डन कार्यरत आहेत. हे नर्सिंग कौन्सिलच्या आदेशाचे उघड उल्लंघन आहे. काही ठिकाणी सरळ - सेवा भरतीने या नियुक्त्या झालेल्या आहेत.
आरोग्य विभागाचाच अपवाद का?आदिवासी विकास व समाजकल्याण विभागाच्या मुलींच्या वसतिगृहात केवळ महिला वॉर्डन असतात, मग आरोग्य विभागातच नियम मोडले जात आहेत? यामागचे अर्थकारण अनाकलनीय आहे. या प्रकाराबाबत काही पालकांनी आरोग्य सचिव व आयुक्तांना वारंवार पत्रव्यवहार करून लक्ष वेधले, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नाही.
"नव्या आदेशानुसार महिलांच्या नर्सिंग वसतिगृहात महिला वॉर्डन देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. महिला नर्सिंग वसतिगृहात वॉर्डन म्हणून महिलाच असावी असे निर्देश यापूर्वी नव्हते. त्यामुळे काही वसतिगृहात आजही पुरुष वॉर्डन कार्यरत आहेत. मात्र, त्यांच्याकडून गैरवर्तणूक होत असेल तर ते कसल्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही. "- डॉ. पुरुषोत्तम मडावी, उपसंचालक नर्सिंग विभाग