शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

महिलेची हत्या करून केला आत्महत्येचा बनाव

By admin | Updated: November 7, 2016 02:41 IST

एका नराधमाने निराधार महिलेचा तिच्या मुलीसमोरच खून केला. नंतर मृतदेहाला गळफास लावून आत्महत्येचा कांगावा केला.

आरोपीचे पाप उघड : नंदनवनमधील घटना नागपूर : एका नराधमाने निराधार महिलेचा तिच्या मुलीसमोरच खून केला. नंतर मृतदेहाला गळफास लावून आत्महत्येचा कांगावा केला. मात्र, मृत महिलेच्या प्रत्यक्षदर्शी मुलींमुळे आरोपीचे पाप उघड झाले आणि नंदनवन पोलिसांनी त्याला खुनाच्या आरोपाखाली अटक केली.शाहिन अज्जूम अहमद अली (वय २७) असे मृत महिलेचे नाव आहे. पाच वर्षांपूर्वी ती पतीपासून विभक्त झाली. दोन मुलींचे भरणपोषण करण्यासाठी ती आरोपी शेख शब्बीर शेख रमजान (वय ४४) याच्या कुलरच्या कारखान्यात काम करू लागली. आरोपीने ती निराधार असल्याचे पाहून तिला स्वत:ची एक रूम देऊन ठेवून घेतले. तो तिच्यावर पत्नीसारखा हक्क दाखवायचा. मारहाण करायचा. तिच्या चारित्र्यावरही संशय घ्यायचा. यामुळे त्यांच्यात अलीकडे सारखे खटके उडायचे. शनिवारी रात्री ८ ते ८.३० च्या सुमारास अशाच प्रकारे संशय घेऊन आरोपी शब्बीरने शाहिनला मारहाण सुरू केली. एवढेच नव्हे तर तिचा गळा दाबून तिला तिच्या मुलीसमोर ठार मारले आणि शाहिनचा मृतदेह गळफास लावून वर टांगला. हा प्रकार कुणाला सांगितल्यास जीवे ठार मारू, अशी मुलींना धमकी दिली. त्यानंतर बाहेर जाऊन शाहिनने आत्महत्या केल्याचा कांगावा करू लागला. शाहिनाची आई रईसा अनवर पठाण (वय ४२, रा. रामकृष्ण नगर) यांना त्यांच्या नातींनी घडलेली घटना सांगितली. त्यानंतर आरोपी पळून गेला. रईसा यांच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी आरोपी शब्बीरविरुध्द खुनाचा गुन्हा नोंदविला.(प्रतिनिधी)संशयखोर पतीमुळे महिलेची आत्महत्यामानकापूरच्या एकतानगरात संगीता किसन चव्हाण (वय ४५) या महिलेने संशयखोर नवऱ्यामुळे आत्महत्या केली. प्रेमसेवा होस्टेलजवळ राहणारा आरोपी किसन निवृत्तीराव चव्हाण (वय ४८) हा पत्नी संगीतांच्या चारित्र्यावर नेहमी संशय घ्यायचा. नुकत्याच झालेल्या एका पारिवारिक सोहळ्यात त्याने संगीतावर नको ते आरोप लावून तिला सर्वांसमोर अपमानित केले. तरुण मुलगा आणि नातेवाईकांसमोर वारंवार अपमान आणि बदनामी होत असल्यामुळे संगीता यांनी शनिवारी सायंकाळी गळफास लावून आत्महत्या केली. तत्पूर्वी त्यांनी एका चिठ्ठीत आपली व्यथा लिहून ठेवली. मुलगा अजय किसन चव्हाण (वय २१) हा घरी आल्यानंतर आत्महत्येची घटना उघडकीस आली. त्याने दिलेल्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी आरोपी किसन चव्हाणविरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.