शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

संचमान्यतेत विशेष शिक्षकांची वेगळी तरतूद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 02:10 IST

संचमान्यतेत विशेष शिक्षकांची वेगळी तरतूद करून वेगळी अनुज्ञेयता करावी, अशी मागणी भाजप शिक्षक सेलच्यावतीने करण्यात आली.

ठळक मुद्देभाजप शिक्षक सेलचे चंद्र्रशेखर बावनकुळे यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संचमान्यतेत विशेष शिक्षकांची वेगळी तरतूद करून वेगळी अनुज्ञेयता करावी, अशी मागणी भाजप शिक्षक सेलच्यावतीने करण्यात आली. ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना यासंबंधीच्या मागणीचे निवेदनसुद्धा सादर करण्यात आले.ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी भाजप शिक्षक सेलच्या पदाधिकाºयांसोबत शिक्षकांच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर तासभर चर्चा करून शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची बैठक बोलावून सर्व प्रश्न निकाली काढण्यात येतील तसेच नागपूर व भंडारा जिल्ह्यात शिक्षक समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येईल, असे सांगितले.सत्र २०१५-२०१६ अन्वये अतिरिक्त ठरलेल्या परीविक्षाधीन शिक्षकाचे (शिक्षण सेवक) वेतन सुरू करून वरिष्ठ व निवड श्रेणी विनाअट सरसकट लागू करावी, संचमान्यतेत ५ वी व ८ वीचे शिक्षक अनुज्ञेय ठरविताना २० विद्यार्थ्यांची अट रद्द करावी. इयत्ता ६ वी ते ८ वीमधील एकूण विद्यार्थी संख्येवर अनुज्ञेय असलेल्या शिक्षकांमध्येच विशेष शिक्षकांना ग्राह्य धरल्यामुळे अतिरिक्त शिक्षकांचे प्रमाण वाढले आहे. २८ आॅगस्ट २०१५ च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार इयत्ता ९ वी व १० वीच्या शिक्षकांचे प्रमाण अनुज्ञेय करण्यात आलेले नाही. एकाच शाळेतील मराठी माध्यम व हिंदी माध्यमची संचमान्यता एकत्र केल्याने अतिरिक्त शिक्षकांचे प्रमाण वाढले. त्यामुळे मराठी व हिंदी माध्यमाची संचमान्यता वेगवेगळी करावी. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांचे १ तारखेला वेतन न होणाºया जिल्ह्यातील अधिकाºयांवर तात्काळ कार्यवाही करावी, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश होता.या बैठकीत आ. चरण वाघमारे, आ. अवसरे, आ. बाळा काशीवर, भंडारा न.प. चे अध्यक्ष सुनील मेंढे यांच्यासह भाजप शिक्षक सेलचे संयोजक महाराष्ट्र प्रदेश डॉ. कल्पना पांडे, विदर्भ संयोजक डॉ. उल्हास फडके, विदर्भ सहसंयोजक अनिल शिवणकर, भंडारा जिल्हा संयोजक शशांक चोपकर, सहसंयोजक कैलास कुरंजेकर, मेघश्याम झंझाड तसेच सुनील ठवरे, नरेंद्र्र मुल्काल्वर, यशवंत नानोटकर, घनश्याम तरोने, बोडके, सुरेश बोंदरे, पंकज धार्मिक, प्रदीप बिबटे, ओमकार श्रीखंडे आदी उपस्थित होते.