शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

माहुरझरी २००० वर्षांपूर्वी हाेते साैंदर्यप्रसाधन निर्यातीचे केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:08 IST

नागपूर : नागपूरपासून अवघ्या १५-२० किलाेमीटरवर गाेरेवाडालगतच्या माहुरझरी गावाने सध्या पुरातत्त्व अभ्यासकांचे लक्ष वेधले आहे. येथे सुरू असलेल्या उत्खननातून ...

नागपूर : नागपूरपासून अवघ्या १५-२० किलाेमीटरवर गाेरेवाडालगतच्या माहुरझरी गावाने सध्या पुरातत्त्व अभ्यासकांचे लक्ष वेधले आहे. येथे सुरू असलेल्या उत्खननातून प्राचीन स्वरूप असलेले मणी व इतर साहित्य माेठ्या प्रमाणात सापडत आहेत. या मण्यांचे आफ्रिका व इजिप्तमध्ये मिळणाऱ्या मण्यांशी साधर्म्य दिसत असल्याने २००० वर्षांपूर्वी हे ठिकाण मणी आणि साैंदर्य प्रसाधन निर्यातीचे केंद्र असावे, असा अंदाज पुरातत्त्व अभ्यासकांकडून व्यक्त केला जात आहे. याशिवाय वाकाटक व सातवाहनकालीन बांधकामांचे अवशेष मिळाल्याने पुरातत्त्व विभागाने अभ्यासासाठी या भागात उत्खनन सुरू केले आहे.

पुरातन वारसातज्ज्ञ व विदर्भ संशाेधन मंडळाचे अधिकारी डाॅ. शेषशयन देशमुख यांनी या प्राचीन अवशेषांबाबत माहिती दिली. माहुरझरीचे महत्त्व सर्वात आधी ब्रिटिश पुरातत्व तज्ज्ञ हंटर यांनी अधाेरेखित केले हाेते. १९३३ साली त्यांनीच माहुरझरीमध्ये सापडणाऱ्या मण्यांचे आफ्रिका व इजिप्तमध्ये मिळणाऱ्या मण्यांशी संबंध असल्याचे नमूद केले. त्यावेळी यवतमाळच्या शारदाश्रम संस्थेच्या वार्षिकांकात याबाबत लिहिलेल्या लेखाचा उल्लेख डाॅ. देशमुख यांनी केला. या भागात वेगवेगळ्या आकाराचे व प्रकारचे पुरातन मणी, बहुविध प्रकारचे दगड सातत्याने सापडत असतात. हे मणी वैशिष्ट्यपूर्ण आहेत आणि जगाच्या सर्व भागात बघायला मिळतात. त्यामुळे प्राचीन काळी साैंदर्यप्रसाधनाचे हे निर्यात केंद्र असावे, असा दावा त्यांनी केला हाेता.

विद्यापीठ व पुरातत्त्व विभागाचे उत्खनन

१९७०च्या काळात राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पुरातत्त्व विभागाचे तत्कालीन विभागप्रमुख शांताराम भालचंद्र देव यांच्या पुढाकाराने विद्यापीठ व राज्य पुरातत्त्व विभागाकडून या भागात उत्खनन सुरू करण्यात आले हाेते. तेव्हापासून मण्यांसह प्राचीन विटा, लाेखंडाचे साहित्य, लज्जा गाैरीचे शिल्प, स्टाेन सर्कल, छाेट्या छाेट्या टेकड्या असलेल्या भागात स्तंभाचे अवशेष, प्राचीन वसाहतीचे चिन्ह आणि महापाषाण संस्कृतीचे अवशेषही सापडत आले आहेत. गाेंड राजवटीचाही संबंध येथे आलेला आहे.

सातवाहनकालीन बांधकामाचे अवशेष

नुकतेच माहुरझरी-सावनेर रस्त्याच्या कामाच्या वेळी खाेदकाम करताना प्राचीन विटा या भागात सापडल्या. त्यांनी लगेच पुरातत्त्व विभागाला माहिती दिली. त्यामुळे विभागाने आता नव्याने उत्खनन सुरू केले आहे. विटा, मातीचे मडके व दाेन ते तीन हजार वर्षांपूर्वीच्या वसाहतीचे अवशेष येथे सापडत आहेत. हे सर्व वाकाटक काळासह त्याआधीच्या सातवाहन काळातील अवशेष असल्याचा विश्वास अभ्यासकांना आहे. येथील कांबळे नामक व्यक्तीच्या शेतामध्ये विभागाने उत्खनन चालविले असून दडलेला इतिहास प्रकाशात येण्याचा विश्वास पुरातत्त्व विभागाला आहे.