शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राने वनसंवर्धनाच्या क्षमता वाढविण्याकडे लक्ष द्यावे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 11:34 IST

Nagpur News राज्याने प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करून टॅक्टीस व तंत्रज्ञानाच्या मदतीने वन्यजीव व वनसंवर्धनासह वनपर्यटन वाढीच्या अधिक क्षमता विकसित कराव्यात, असा मत संदेश मध्य प्रदेशचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) आलोक कुमार यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देमध्य प्रदेशचे पीसीसीएफ आलोक कुमार यांनी टोचले कान

निशांत वानखेडे/संजय रानडे

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महाराष्ट्रात सहा व्याघ्र प्रकल्प आहेत आणि वनपर्यटन वाढण्याच्या माेठ्या क्षमता आहेत, पण त्याकडे हवे तसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे वन्यजीव संवर्धन ते संघर्षाच्या अनेक समस्या निर्माण होतात. राज्याने प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करून टॅक्टीस व तंत्रज्ञानाच्या मदतीने वन्यजीव व वनसंवर्धनासह वनपर्यटन वाढीच्या अधिक क्षमता विकसित कराव्यात, असा मत संदेश मध्य प्रदेशचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) आलोक कुमार यांनी व्यक्त केले.

केंद्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाद्वारे आयोजित वरिष्ठ वनाधिकाऱ्यांच्या बैठकीत सहभागी झालेल्या कुमार यांनी ‘लोकमत’शी गुरुवारी संवाद साधला. २००६ पासून वन्यजीव शाखेतील वेगवेगळ्या पदावर कार्य केलेल्या आलोक कुमार यांनी पेंच व्याघ्र प्रकल्पाचीही जबाबदारी सांभाळली आहे. त्यानंतर मध्य प्रदेशात विभागाच्या सर्वोच्च पदाची जबाबदारी ते सांभाळत आहेत. त्यांनी सांगितले, मध्य प्रदेशात वनविकासासाठी या काळात बरेच प्रयत्न केले गेले. विभागात प्रशिक्षित मनुष्यबळाच्या समावेशावर भर देण्यात आला. नवनवे डावपेच आखून मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यात आला. सुसज्ज वाहने, आधुनिक साहित्य व तंत्रज्ञानाच्या मदतीने वनसंवर्धनाच्या नव्या कल्पनांची अंमलबजावणी करण्यात आली. संघटित प्रयत्नांमुळे आज देशात वाघ व बिबट्यांची सर्वाधिक संख्या मध्य प्रदेशात आहे. मांसभक्षी व तृणभक्षी प्राण्यांच्या संवर्धनात आणि वनपर्यटनाच्या बाबतीतही राज्याचे स्थान शिखरावर आहे.

आम्ही थांबलो नाही. मध्य प्रदेश वनविभाग अनेक गोष्टींवर कार्य करीत आहे. वन्यजिवांचे भ्रमणमार्ग (कॉरिडोर) अधिक सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न चालले आहेत. प्राण्यांच्या सुरक्षित भ्रमणासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने रेल्वेमार्ग व महामार्गांवरील लिंकेज अधिक मजबूत करण्यात येत आहेत. प्रदेशात पर्यटनाची क्षमता वाढविण्यासाठी व्याघ्र प्रकल्पांच्या बफर झोनमध्ये ईको-टुरिझमला चालना देण्याची योजना कार्यान्वित केली असून, पर्यटनाची क्षमता वाढण्याचा विश्वास कुमार यांनी व्यक्त केला. यामुळे स्थानिक नागरिकांनाही रोजगाराच्या संधी वाढल्याचे समाधान आहे. पर्यटन केवळ व्याघ्र केंद्रित न ठेवता लॅन्डस्केपिंग, वारसास्थळे, धबधबे, मचान सायटिंग, पक्षी निरीक्षण, ट्रॅकिंग अशा सर्व क्षेत्रातील पर्यटनवाढीच्या योजना आखण्यात आल्या व त्या यशस्वीही झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोकसहभागाशिवाय कोणत्याही कल्पना यशस्वी होत नाहीत. त्यामुळे स्थानिक नागरिकांचा अधिकाधिक सहभाग करून घेण्यावर भर देण्यात आला. वन हक्काचे दावे वेगाने निकाली काढण्यात आले आणि स्थानिकांच्या हक्कांचे संवर्धन करण्यात आले. त्यामुळे वन्यजिवांच्या शिकारीवर, मृत्यूवर नियंत्रण आले, वन्यजीव-मानव संघर्षही कमी झाला व पर्यटनातही राज्य अग्रेसर झाल्याचा दावा आलोक कुमार यांनी केला.

टॅग्स :forest departmentवनविभाग