शहरं
Join us  
Trending Stories
1
IndiGoच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार, सरकारसोबतच्या बैठकीत CEO हात जोडताना दिसले...
2
"इंदिरा गांधी यांनी मतचोरी करूनच रायबरेली जिंकली..."; भाजपा खासदाराचे राहुल गांधींना उत्तर
3
“उद्धव ठाकरेंच्या हट्टामुळे मला बाहेर काढले, ‘त्या’ भाजपा नेत्याला माफी नाही”: किरीट सोमय्या
4
"विरोधी पक्षनेते असण्याचा अर्थ असा नाही की..."; राहुल गांधींना संसदेतच ओम बिर्लांनी सुनावलं
5
IND vs SL WT20I :भारतीय संघाची घोषणा; स्मृती मानधना खेळणार; 'या' दोघींना मिळालं मोठं सरप्राइज
6
RSS ला देशातील सर्व संस्थांवर ताबा मिळवायचा आहे; लोकसभेत राहुल गांधी कडाडले...
7
“आम्हाला EVM मशीन एकदा पाहायला हवे”; राहुल गांधींची लोकसभेत मागणी, मतचोरीचा मुद्दा उपस्थित
8
"भाजप काय करतंय हे त्यांनी जगाला दाखवून दिलं"; सुप्रिया सुळेंनी केलं निलेश राणेंचे कौतुक
9
कला केंद्राच्या प्रेमकथेचा भयावह शेवट; नर्तकीसमोरच पत्नीचा फोन आल्याने वाद, तरुणाने स्वतःला संपवले
10
प्रेरणादायी! वडील गमावल्याचं दुःख पण आईची खंबीर साथ; IAS होऊन पूर्ण केलं कुटुंबाचं मोठं स्वप्न
11
हृदयद्रावक! आंघोळीला गेला, जीव गमावला; गीझर बनला सायलेंट किलर, तरुणासोबत घडलं आक्रित
12
Jara Hatke: फुटक्या कवडीची खरी किंमत माहितीय? प्राचीन चलनव्यवस्थेशी आहे थेट संबंध 
13
"हे खूप घाणेरडं... जरा मर्यादा पाळा"; माहिकाच्या Viral Video वरून हार्दिक पांड्या संतापला
14
‘वंदे मातरम्’चे दोन तुकडे केले नसते तर देशाची फाळणी झाली नसती, अमित शाहांची नेहरूंवर टीका 
15
Puja Rituals: उदबत्तीची रक्षा, जळलेल्या वाती तुम्ही कचऱ्यात तर फेकून देत नाही ना? 
16
महिला पडली तरुणाच्या प्रेमात, बकरी चरायला नेण्याच्या बहाण्याने झाली घरातून पसार, त्यानंतर...
17
गोव्यातील 'त्या' क्लब मालकांची अवैध मालमत्ता पाडण्याचे आदेश; कारवाई टाळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणला होता दबाव
18
'इंडिगो'मुळे गुंतवणूकदारांनाही मोठा फटका! ८ दिवसांत १७,६६० कोटींचे नुकसान; मुच्युअल फंडही तोट्यात
19
“दादा रुसून कधी बारामतीला निघून गेले नाहीत, महाराष्ट्रात अजितपर्व येईल”; कुणी केला दावा?
20
Kitchen Tips: गॅस सिलेंडरची नळी कधी बदलायची? स्फोट टाळण्यासाठी माहीत हवे 'हे' नियम!
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा : फलटण आत्महत्येप्रकरणी एसआयटीसह न्यायालयीन चौकशी

By आनंद डेकाटे | Updated: December 9, 2025 18:13 IST

मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत माहिती : लवकरच आरोपपत्र, सुसाईड नोटमधील हस्ताक्षर तिचेच

आनंद डेकाटे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : सातारा जिल्ह्यातील फलटण येथील  शासकीय रुग्णालयातील महिला डाॅक्टरच्या आत्महत्येप्रकरणी एसआयटीकडून चौकशी पूर्ण झाली असून, या प्रकरणातील इतरही तथ्ये सुटू नयेत म्हणून न्यायालयीन चौकशीही केली जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. या प्रकरणी लवकरच आरोपपत्र दाखल होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

मुख्यमंत्री म्हणाले, ही घटना दुर्दैवी आहे. या घटनेने समाजात एक संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर चौकशी केली असता यातील आरोपी गोपाल बदने व प्रशांत बनकर यांना अटक करण्यात आली. आत्महत्या केलेल्या डॉक्टराच्या हातावरील हस्ताक्षर तिचेच होते. फॉरेन्सिक व डिजिटल अहवालाने हे उघडकीस आले आहे. अधिकच्या तपासासाठी महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन करण्यात आली. मृत तरुणीवर दबाव आणून अनफिट प्रमाणपत्र मिळवून घेतला जात होता. विशेष म्हणजे यासाठी तिची स्वतंत्रपणे विशेष दिनी ड्युटी लावली जात होती. आरोपी बदने याने आधी तिला लग्नाचे आमिष दिले. त्यानंतर तिचे शारीरिक शोषण केल्याची बाब पुढे आली. ती ज्या हॉटेलमध्ये होती, त्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज पुढे आले असून, यातून आरोपी व संपूर्ण घटनाक्रमाची नोंद करण्यात आली. या प्रकरणी इतरही आरोप असल्याने तपास सुरूच असून, अनेक गोष्टींचा तपास करण्यासाठी एका न्यायाधीशांची नेमणूक करण्यात आली आहे. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी वारंवार तिचीच ड्युटी का लावली जात होती, असा प्रश्न करीत हे प्रकरण दहशत निर्माण करणारे आहे, याकडेही लक्ष वेधले. नाना पटोले, ज्योती गायकवाड, अमित साटम, सुनील प्रभू यांनीही प्रश्न उपस्थित केले. 

कुटुंबातील एकाला नोकरी द्या

राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंकी यांनी संबंधित आत्महत्या केलेल्या तरुणीच्या कुटुंबातील एकास नोकरी देण्याची मागणी केली. मात्र, ती ११ महिन्यांच्या कंत्राटी पद्धतीवर होती. अशाप्रकरणी अनुकंपा तत्त्वावर नोकरी देता येत नाही. तरीही, मानवीय दृष्टिकोनातून काय मदत करता येईल, ती केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Falton suicide case: SIT and judicial inquiry ordered by assembly.

Web Summary : The Falton suicide case of a doctor is under SIT and judicial review. Evidence points to harassment and exploitation by the accused. The government is considering assistance to the victim's family.
टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनvidhan sabhaविधानसभाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस