शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

तीन जागा मागा, अन्यथा आघाडी तोडा!

By admin | Updated: August 13, 2014 00:44 IST

विधानसभा निवडणुकीत नागपूर शहरात किमान तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला याव्यात, यासाठी पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मंगळवारी शहर अध्यक्ष अजय पाटील

राष्ट्रवादी आक्रमक : पवार, तटकरे, पाटील यांना साकडे नागपूर : विधानसभा निवडणुकीत नागपूर शहरात किमान तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला याव्यात, यासाठी पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मंगळवारी शहर अध्यक्ष अजय पाटील यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर.आर. पाटील व प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेत शहरात राष्ट्रवादीसाठी तीन जागा मागा अन्यथा काँग्रेससोबतची आघाडी तोडा, अशी आग्रही मागणी केली.उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर.आर. पाटील व प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे हे तिन्ही नेते गडचिरोलीतील कार्यक्रम आटोपून हेलिकॉप्टरने नागपूर विमानतळावर आले. या वेळी अजय पाटील यांच्यासह सरचिटणीस राजेश कुंभलकर, योगेश मसराम, प्रशांत बनकर, पराग नागपुरे आदींनी त्यांची भेट घेतली व पक्षाला उमेदवारी मिळणे कसे आवश्यक आहे, ते पटवून दिले. काँग्रेसची आघाडी होत नसेल तर राष्ट्रवादी सहाही जागांवर लढण्यास तयार आहे. इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे. पश्चिम नागपुरात काँग्रेस गेल्या २० वर्षांपासून पराभूत होत आहे. पूर्व व मध्य नागपुरातही मोठ्या फरकाने काँग्रेस हरली आहे. लोकसभेतही या मतदारसंघात काँग्रेसची पिछेहाट झाली आहे. त्यामुळे काँग्रेसची आघाडी करताना पश्चिम, पूर्व व मध्य नागपूर या तीन जागा पक्षाला मिळाव्यात, अशी बाजू मांडण्यात आली. राष्ट्रवादीला शहरात एकही जागा मिळणार नसेल तर आघाडी करण्यात अर्थ नाही. महापालिका निवडणुकीत २००७ मध्ये जागावाटपात राष्ट्रवादीला १३६ पैकी २२ मिळाल्या. यापैकी पश्चिममध्ये राष्ट्रवादीचे सहा नगरसेवक विजयी झाले. तीन दुसऱ्या क्रमाकांवर होते, तर काँग्रेसचे पाच नगरसेवक विजयी झाले. २०१२ मध्ये २९ जागा राष्ट्रवादीला मिळाल्या. त्यातील दोन पश्चिममध्ये विजयी झाले. तीन जागा थोड्या फरकाने हरल्या. आता विधानसभेत एकही जागा मिळाली नाही तर काँग्रेसची हुकूमशाही वाढेल व पुन्हा महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला ३० ते ४० जागाच दिल्या जातील. हा कार्यकर्त्यांवर अन्याय ठरेल. त्यामुळे विधानसभेच्या जागावाटपातच कणखर भूमिका घेण्याची मागणी करण्यात आली. पवार, तटकरे व पाटील या तिन्ही नेत्यांनी स्थानिक नेत्यांचे म्हणणे ऐकून घेतले व जागावाटपात याचा विचार केला जाईल, असे आश्वस्त केले. (प्रतिनिधी)